विमानतळावर उतरलेल्यांना सक्तीचे अलगीकरण, ओमिक्रॉन कोरोनाचा रुग्ण आढळल्यास इमारत सील, मुंबई पालिका सज्ज

विमातनळावर उतरलेल्याा प्रवाशांना आता संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात आलंय. तसेच कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. तशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय.

विमानतळावर उतरलेल्यांना सक्तीचे अलगीकरण, ओमिक्रॉन कोरोनाचा रुग्ण आढळल्यास इमारत सील, मुंबई पालिका सज्ज
CORONA AND BMC
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 8:17 PM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह हाँगकाँग येथे कोरोनाचे ओमिक्रॉन हे नवे रुप आढळले आहे. कोरोनाच्या या नव्या रुपाची संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. महाराष्ट्रातील मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवसी येतात. याच कारणामुळे आता मुंबई पालिका सज्ज झाली आहे. विमातनळावर उतरलेल्या प्रवाशांना आता संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. तशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलीय.

मुंबई महापालिकेकडून कोणती खबरदारी घेण्यात येणार ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी कोरोनाच्या नव्या रुपाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. या प्रवाशांचे कोणत्याही परिस्थितीत गृह अलगीकरण करण्यात येणार नाही. दुर्दैवाने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आलाच तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येतील.

…तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार

तसेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसेच कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट करण्यात येईल. तसेच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. व्हेंटिलेटरची तपासणी करुन ते गरजेनुसार वापरण्यात येतील. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करुन ठेवण्यात येणार आहे. घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे. तशी माहिती काकाणी यांनी दिलीय.

नवी मुंबईत प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार

नवी मुंबई महापालिकेनेदेखील खबदारी म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्यात येणार आहे. तशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलीय.

इतर बातम्या :

राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल; भुजबळांनी उडवली खिल्ली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.