कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची सखोल चौकशी, 48 तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश

मुंबईतील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये कोरोना लसीकरणासाठी कॅम्प लावण्यात आला होता. सोसायटीमधील 390 लोकांनी लस देखील घेतली. मात्र, लस घेतल्यानंतर त्यांना अद्याप कसल्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही.

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची सखोल चौकशी, 48 तासांत अहवाल सादर करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश
CORONA VACCINE
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 8:14 PM

Mumbai Vaccine Scam : मुंबई: पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृहसंकुलात झालेल्या संशयास्पद कोविड-१९ लसीकरण (Mumbai Corona Vaccine Scam) प्रकाराची सखोल चौकशी करुन 48 तासांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी खासगी लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करुन, त्यांच्या नोंदणीसह सर्व बाबींची खातरजमा करुन नंतरच लसीकरण उपक्रम राबवावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (BMC will start enquiry in Kandivali corona vaccination scam order issued for submit report within 48 hours)

390 नागरिकांना लस

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृह संकुलात सुमारे 390 रहिवाशांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र, लसीकरण करणाऱया संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशयास्पद निर्माण करणारा असल्याने रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संशयास्पद लसीकरण प्रकाराची चौकशी करुन 48 तासांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी उपआयुक्त (परिमंडळ 7) विश्वास शंकरवार यांना दिले आहेत.

संशयास्पद लसीकरण, गंभीर बाब

दरम्यान, असे संशयास्पद लसीकरण होणे, ही बाब गंभीर व अनुचित तसेच आरोग्यास धोकादायक आहे. नागरिकांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये लसीकरण करण्यापूर्वी खासगी रुग्णालय लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. तशा मार्गदर्शक सूचना महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक बाबींची खातरजमा करुन खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अडचण आल्यास पालिकेशी संपर्क साधण्याचं आवाहन

प्रत्येक खासगी लसीकरण केंद्रास कोविन प्रणालीतर्फे एक नोंदणी क्रमांक देण्यात येतो. हे लक्षात घेता, ज्या खासगी लसीकरण केंद्राच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थेमध्ये लसीकरण होणार आहे, त्या संबंधीत खासगी लसीकरण केंद्राच्या नोंदणी संदर्भात नागरिकांनी व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खातरजमा करावी.

खासगी लसीकरण केंद्रातर्फे होणाऱया लसीकरणासाठी संबंधित संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासह, त्या केंद्रातर्फे लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱयांचे ओळखपत्र पडताळावे. त्या संदर्भात योग्य शहानिशा करावी. तसेच लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र त्वरित मिळण्याचा आग्रह करावा, असेही प्रशासनाकडून पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे. या संदर्भात कोणत्याही संशयास्पद बाबी आढळून आल्यास आपल्या विभागातील संबंधीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले ? पुढचे नियोजन काय ?

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

(BMC will start enquiry in Kandivali corona vaccination scam order issued for submit report within 48 hours)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.