Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पालिका सरसावली; चार सूत्री अ‍ॅक्शन प्लान तयार

मुंबईसह संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. (bmc's action plan ready to provide oxygen for hospitals in mumbai)

ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पालिका सरसावली; चार सूत्री अ‍ॅक्शन प्लान तयार
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 2:57 PM

मुंबई: मुंबईसह संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. मुंबईत ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेने थेट चार सूत्री कार्यक्रम तयार केला आहे. तसेच सर्वच रुग्णालयांना या चार सूत्री कार्यक्रमाचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देशही पालिकेकडून देण्यात आले आहेत. (bmc’s action plan ready to provide oxygen for hospitals in mumbai)

मुंबईतील दोन घटना

17 एप्रिल रोजी महानगरपालिकेच्‍या सहा रुग्‍णालयांमधून 168 रुग्‍णांना प्राणवायू उपलब्‍ध असलेल्‍या महानगरपालिकेच्‍याच इतर रुग्‍णालयांमध्‍ये अक्षरशः युद्ध पातळीवर कार्यवाही करुन सुरक्षितपणे स्‍थलांतर‍ित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर बुधवार दिनांक 21 एप्रिल रोजी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्‍णालयातील प्राणवायू साठा संपण्‍यास जेमतेम दीड तासांचा अवधी शिल्‍लक असताना रुग्‍णालयाने महानगरपालिकेला ही बाब कळवली. त्‍याही दिवशी महानगरपालिका प्रशासनाने पुन्‍हा युद्ध पातळीवर कार्यवाही करुन तत्‍परतेने व वेळेच्‍या आत प्राणवायू उपलब्‍ध करुन देण्यात आला होता.

समन्वयासाठी अधिकारी नेमले

या दोन घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच मुंबईसाठी दैनंद‍िन गरजेपेक्षा अधिक आवश्‍यक असलेला प्राणवायू साठा अद्यापही उपलब्‍ध झालेला नसल्‍याची बाब लक्षात घेता, पालिका प्रशासनाने एक कार्यपद्धतीच सुनि‍श्चित केली आहे. प्राणवायू संदर्भात आणीबाणीची परिस्थिती वारंवार रुग्‍णालयांमध्‍ये उद्भवणार नाही, यासाठी ही निश्चित कार्यपद्धती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील.

आयुक्तांचे आदेश

पालिका आयुक्‍त इकबालसिंह चहल यांच्‍या आदेशानुसार, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) पी. वेलरासू यांनी या सुनिश्चित कार्यपद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. ही कार्यपद्धती सर्व विभागीय कार्यालये, सार्वजनिक आरोग्‍य विभाग यासह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी तंतोतंत अंमलात आणण्‍याचे सक्‍त निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. सर्व सहाय्यक आयुक्त यांनी त्‍यांचे विभागीय वैद्यकीय अधिकारी तसेच नियंत्रण कक्षातील अधिकारी यांना या कार्यपद्धतीविषयी अवगत करावे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी याबाबत सर्व रुग्णालयांना सूचित करावे. मुंबईतील सर्व संबंधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे भरती असलेल्या रुग्णांच्या संख्येप्रमाणे प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत योग्य ती दक्षता व जबाबदारी घ्यावी, याबाबत त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशा सूचनाही यातून करण्‍यात आल्‍या आहेत.

चार सूत्री कार्यक्रम

>> महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात एक सांख्यिकी तक्‍ता (डेटा शीट) तयार करून त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती प्रसिद्ध करावी. या तक्‍त्‍यामध्‍ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व त्यांना प्राणवायू पुरविणाऱ्या पुरवठादाराचे नाव, त्याचप्रमाणे सदर रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जम्बो आणि छोटे प्राणवायू सिलेंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्‍ट करण्‍यात येईल. ही माहिती महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन (FDA) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त विभाग कार्यालयात इतर रुग्णालय कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती विभाग कार्यालय अद्ययावत करतील व प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांना eemechsouth.me@mcgm.gov.in या ई-मेलवर अवगत करतील. ही सुधारीत माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करुन देण्यात येईल.

>> प्राणवायूचा पुरवठा रुग्णालयात योग्य वेळेत व्हावा, यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील.

अ) रुग्णालयाने प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे किमान 24 तास किंवा त्यांच्या करारनाम्याप्रमाणे, यातील जो कालावधी जवळ असेल त्याआधी करावी. ब) 16 तासामध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय याबाबत विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवतील. क) विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर विभागातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास विभागातील नियंत्रण कक्ष याबाबत अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला कळवतील. ड) अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष याबाबत गरजेनुसार विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधतील आणि माहिती देतील. इ) विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता हे आवश्‍यकतेनुसार वाहनांमधून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करतील आणि याबाबत वरिष्ठांना कळवतील.

>> सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अखत्यारितील कोविड रुग्णालयास प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याकरीता या सूचनांचे पालन करण्यासाठी कळवतील.

>> त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकारी संबंधित रुग्णालयाच्या संपर्कात राहून तेथील प्राणवायू सिलेंडर्सची नोंद ठेवतील. (bmc’s action plan ready to provide oxygen for hospitals in mumbai)

संबंधित बातम्या:

शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश

Virar Hospital Fire | विरारच्या आगीत कोण कोण होरपळले? वाचा संपूर्ण यादी

Virar Covid Hospital fire | विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, 14 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

(bmc’s action plan ready to provide oxygen for hospitals in mumbai)

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....