अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, ‘मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..’

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदाच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोविंदाने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेश करताच म्हणाला, 'मी 14 वर्षांच्या वनवासानंतर..'
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 5:48 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याचा पक्षप्रवेश झालाय. गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली. गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा एकाच गाडीतून प्रवास करुन बाळासाहेब भवन येथे दाखल झाले. यानंतर इथे गोविंदाचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

’14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर…’

“नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपेने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”, असं गोविंदा म्हणाला.

‘माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांची कृपा राहिली’

“फिल्मसिटी मॉर्डन आहेच. मुंबई आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेय. विकास दिसतोय. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत विकास दिसतोय. रस्ते असो, सौंदर्यकरण असो, याला सुरुवात झालीय. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांची कृपा राहिली”, असं गोविंदा म्हणाला. “एकनाथ शिंदे यांचं व्यक्तीमत्व मला आवडलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला”, असं गोविंदा म्हणाला.

गोविंदा कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांची माहिती

“एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं पक्षात प्रवेश केला. गोविंदा आपल्यासोबत कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत आले. चित्रपटसृष्टी आणि सरकार यांच्यातील गोविंदा दुवा आहेत. गोविंदा आता शिवसेनेचे स्टार प्रचारक राहतील”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आमच्या सरकारच्या कामांनी प्रभावित होऊन गोविंदा शिवसेनेत सहभागी झाले”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “चित्रपटसृष्टी आणि कलाकारांसाठी काम करायचं आहे, असं गोविंदा मला म्हणाले आहेत. सरकार म्हणून आम्ही निश्चितच त्यांच्या पाठिमागे उभं राहू”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.