बॉलिवूडशी कनेक्शन असलेल्या वांद्र्याची आज ही अवस्था, कुठे नेऊन ठेवलाय वांद्रे आमचा?
मुंबईतील वांद्रे इथल्या निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केला. या घटनेनंतर वांद्रे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात वांद्यात तीन हाय प्रोफाइल गुन्हे झाले आहेत. यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात..

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरुवारी (16 जानेवारी) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांची खंडणी मागत केलेल्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. हा हल्लेखोर अकराव्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून सैफच्या घरात शिरला होता. त्याने सैफवर सहा वार केले आणि त्यानंतर तो पळून गेला. मुंबई पोलिसांची दहा पथकं त्याचा शोध घेत आहेत. या हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर एकंदरीत बॉलिवूड सेलिब्रिटींची सुरक्षा आणि मुंबईतील वांद्रे परिसरात सतत व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींवर होणारे हल्ले हा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी मंत्री आणि अनेक सेलिब्रिटींसोबत जवळचा संबंध ठेवणारे बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता त्यानंतर सैफच्या घरात झालेला हल्ला.. अशा घटनांमुळे उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या वांद्रे (Bandra) परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. वांद्रे परिसरात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. सैफवरील झालेल्या हल्ल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी तिथल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. ...