शंतनूनंतर निकिताला दिलासा; तीन आठवडे अटक न करण्याचे आदेश
टूलकिट प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या अॅड. निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. (Bombay High Court Holds Nikita Jacob's Arrest For 3 Weeks)
मुंबई: टूलकिट प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या अॅड. निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. टूलकिट प्रकरणात निकिता यांना तीन आठवड्यांपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. शंतनू मुळुक यांच्यानंतर निकिता यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Bombay High Court Holds Nikita Jacob’s Arrest For 3 Weeks)
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने 11 फेब्रुवारी रोजी टूलकिट प्रकरणी निकिताच्या घरी छापा मारला होता. पोलिसांनी निकिताचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला होता. याप्रकरणी निकिताने कोर्टात धाव घेतली. तिच्या बाजूने ज्येष्ठ वकील मिहिर देसाई यांनी बाजू मांडली. निकिता गेल्या 17 वर्षांपासून वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहे. त्याशिवाय पर्यावरणाबाबत अत्यंत जागरुक आहे. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा तिच्यावर प्रभाव पडला होता, असं देसाई यांनी कोर्टाला सांगितलं.
टूलकिट अनेक लोकांनी तयार केलं
केवळ ग्रेटा थनबर्गने टूलकिट शेअर केल्यामुळे हे प्रकरण वाढलं. मात्र, टूलकिट अनेक लोकांनी तयार केलं असल्याचं उघड झालं आहे. या टूलकिटमध्ये हिंसेला कोणतंही प्रोत्साहन दिलेलं नाही. तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करण्याचंही त्यात म्हटलेलं नाही, असं निकिताच्या वकिलाने सांगितलं. अशा प्रकारच्या मोहिमा चालवण्यासाठी ग्रुपच्या विविध लोकांची मदत घेतली जाते. परंतु, व्हॉट्सअॅप ग्रुपमधील 50 लोकांपैकी केवळ एकच व्यक्ती पोएटिक्स जस्टिस फाऊंडेशनशी संबंधित आहे. याचा अर्थ असा नाही की तो खलिस्तानबाबत बोलत आहे, असंही तिच्या वकिलाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
निकिताचा राजकीय अजेंडा नाही
निकिताचा कोणताही राजकीय किंवा धार्मिक अजेंडा नसल्याचं कोर्टाने सुनावणीवेळी मान्य केलं. तसेच हे प्रकरण आपल्या अधिकार क्षेत्रातील नसल्याचं कोर्टाने सांगितलं. दिल्लीच्या स्पेशल सेलने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या अधिकार क्षेत्रात हे प्रकरण नसल्याने त्यावर सुनावणी करणं किंवा निकिताला दिलासा देणं आपल्या हाती नाही, असं सांगत कोर्टाने निकिताला ट्रान्झिस्ट जामीन दिला आहे.
निकिता कोण आहे?
निकिता जेकब या व्यवसायाने वकील आहेत. त्या दिवाणी खटले हाताळतात. तसेच सामाजिक न्याय आणि पर्यावरणासाठी आवाज उठवणाऱ्या त्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत.
टूलकिट नेमकं काय आहे?
टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. (Bombay High Court Holds Nikita Jacob’s Arrest For 3 Weeks)
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/eZkMfgXquL
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
संबंधित बातम्या:
कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!
शेतकरी आंदोलनात पाठिंबा दिल्यामुळेच गुन्हा, शंतनू यांच्या कुटुंबियांचा केंद्र सरकारवर आरोप
(Bombay High Court Holds Nikita Jacob’s Arrest For 3 Weeks)