डॉक्टरांना आपण सहज देव मानत नाही, मुंबईतल्या डॉक्टरांचा चमत्कार

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील फिनिक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एक चमत्कारिक ऑपरेशन केलं आहे. एका 75 वर्षीय वृद्ध रुग्णाच्या पोटात अडीच किलो वजनाची प्लीहा (spleen) आली होती. रुग्णाचे कुटुंबीय चिंतेत होते. पण डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबियांची चिंता दूर केलीय. तसेच 75 वर्षीय आजोबांना होणारा त्रास बंद केलाय.

डॉक्टरांना आपण सहज देव मानत नाही, मुंबईतल्या डॉक्टरांचा चमत्कार
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:15 PM

मुंबई : डॉक्टरांना आपण देव मानतो. ते सहज मानत नाहीत. तर त्यामागे कारण आहे. मुंबईच्या बोरिवली येथे एका 75 वर्षीय वृद्धाच्या पोटात खूप दुखत होतं. या वृद्धाला गेल्या सहा महिन्यांपासून त्रास सुरु होता. अखेर वृद्धाची तपासणी केली असता त्याच्या पोटामध्ये अडीच किलो वजनाची प्लीही (spleen) निघालं आहे. विशेष म्हणजे जवळपास दोन ते अडीच वर्ष हे ऑपरेशन सुरु होतं. रुग्णाचं वय जास्त असल्याने अनेक अडचणी होत्या. पण या सगळ्या अडचणींवर मात करत बोरिवलीच्या फिनिक्स रुग्णालयातील डॉ. नितीन दिवटे यांच्या टीमने वृद्धाचे प्राण वाचवले आहेत.

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील फिनिक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी एक चमत्कारिक ऑपरेशन केलं आहे. एका 75 वर्षीय वृद्ध रुग्णाच्या पोटात अडीच किलो वजनाची प्लीहा (spleen) आली होती. रुग्णाचे कुटुंबीय चिंतेत होते. रुग्णाची प्रकृती खालावली होती. गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णाला त्रास सुरु होता. डॉक्टरांकडे ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण रुग्णाचे वय 75 वर्षे आहे. त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होईल की नाही, अशी भीती डॉक्टरांना होती. पण डॉक्टरांना या शस्त्रक्रियेत चांगलं यश मिळालं आहे.

रुग्णाच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन फिनिक्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी 75 वर्षीय रुग्णाच्या पोटावर शस्त्रक्रिया करून अडीच किलोची प्लीहा (spleen) बाहेर काढली. या शस्त्रक्रियेत त्यांना एक उत्तम यश मिळविले. यशस्वी ऑपरेशननंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी फिनिक्स रुग्णालयाच्या डॉक्टरांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

हे सुद्धा वाचा

रुग्णाच्या सूनेकडून डॉक्टरांचे आभार

रुग्णाच्या सून शीतल लाड यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचित केली. यावेळी त्यांनी डॉ. नितीन दिवटे यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. “हिमोग्लोबिन कमी होत असल्याने माझ्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तेव्हा आम्हाला समजलं की त्यांच्या पोटात स्प्लीन आहे. त्याला काढावं लागेल. डॉक्टर नितीन दिवटे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं”, शीतल लाड यांनी सांगितलं.

“माझ्या सासऱ्यांचं दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं. माझे सासरे ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी चालायला फिरायला लागले. त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. महत्त्वाचं म्हणजे वय 75 असल्याने आम्ही चिंताग्रस्त होतो. पण डॉक्टरांच्या टीमने व्यवस्थित ऑपरेशन केलं. त्याबद्दल त्यांचे खूप आभार”, असं शीतल लाड म्हणाल्या.

डॉ. नितीन दिवटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आपल्याकडे 75 वर्षाचे वृद्ध दाखल झाले होते. स्प्लीन 30 सेंटीमीटर लांब होतं आणि अडीच किलो वजन होतं. आम्ही मंगळवारी ऑपरेशन केलं. ते यशस्वी झालं. ऑपरेशननंतर दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थित चालत होते, जेवण करत होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला. स्प्लीन सर्जरी कठीण असते. रुग्णाचे प्लेटलेट्स कमी होते, हिमग्लोबिन कमी होतं. सर्व नियंत्रणात आणून सर्जरी केली. जवळपास अडीच तास सर्जरी चालली”, अशी माहिती नितीन दिवटे यांनी दिली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.