मुंबई : या पावसाळ्याच्या (Rain) दिवसात पाण्यात खेळण्याचा मोह काही केल्या मुलांना आवरत नाही. त्यामुळे आत्ताच्या दिवसात समुद्रकिनारची (Juhu Beach) गर्दी ही वाढलेली पाहायला मिळते. अनेक मुलं बीचवर खेळण्यासाठी येतात. कधी कधी ती समुद्राच्या पाण्यातही उतरतात. मात्र योग्य काळजी न घेतल्या हेच महागात पडून शकतं. याचच एक उदाहरण आज मुंबईतल्या जुहू बीचवर पहयाला मिळालं आहे. कारण मुंबईतील जुहू बीचवर आज दुपारी साडेतीन वाजता पाण्यात खेळताना तीन मुले बेपत्ता (Boys Drown) झाली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी 1 बालकाची सुटका करण्यात आली असून, उर्वरित मुलांचा शोध सुरू आहे. त्या क्षणी तेथे किती मुले होती आणि ती पाण्यात बुडाली आहेत की इतरत्र गेली आहेत, त्याचा शोध अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस करत आहेत.
मुंबईतील जुहू बीचवर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एफआरटी पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. नौदलाकडूनही यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.
Maharashtra | Three teens are feared to have drowned at Juhu beach in Mumbai. The search operation by the FRT team is in progress. Navy divers mobilized: BMC
— ANI (@ANI) June 14, 2022
मुंबईतल जुहू चौपाटीवर काही तासांपूर्वी अमन सिंह, वय 21 वर्षे, कौस्तुभ गणेश गुप्ता, वय 18 वर्षे, तसेच प्रथम गणेश गुप्ता, वय 16 वर्षे असे तिघेजण खेळण्यासाठी गेले होते. मात्र खेळता खेळता ते पाण्यात गेले. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसात समुद्रही जास्त खवळलेला आहे. समुद्रावर मोठ मोठ्या लाटा आहेत. अशा लाटात सहज पोहणे शक्य होत नाही. अशा लाटा या किनाऱ्यावरील पाण्यातल्या मानला समुद्रात ओढून नेताता. तसाच काहीसा प्रकार याही मुलांसोबत घडला आहे. त्यामुळे हा घटनेने या परिसरातही खळबळ माजली आहे. पावसाळ्याच्या दिवसात आणि इतर वेळीही समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डही तैनात असतात. मात्र काही जणांकडून नियम मोडून पाण्यात उतरण्यासारखे प्रकार घडतात. मात्र हेच प्रकार नंतर डोकेदुखी वाढवतात. त्यामुळे या दिवसात तर समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.