मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून

मिर्झापूर-2 मध्ये ललित चे पात्र साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा या गुणी कलाकाराचे निधन झाले. तो फक्त 32 वर्षाचा होता. ब्रह्मा याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून
ब्रह्मा मिश्रा याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 6:06 PM

मुंबई :  मिर्झापूर-2 सारख्या वेबसीरीजमध्ये ललितचे लोकप्रिय पात्र साकरणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले आहे. ब्रह्मा याला 29 नोव्हेंबर रोजी छातीत दुखत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक औषधोपचार सुरु केले होते. मात्र घरीच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. दिव्येंदु शर्मा यांनी इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

तीन दिवस मृतदेह बाथरूममध्येच

या विषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसारस,   ब्रह्मा याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा तो बाथरूममध्ये होता. त्याचा मृतदेह सलग तीन दिवस मुंबईतील वर्सोवा येथील घरात बाथरूममध्येच राहिला. सध्या मुंबई पोलीस त्याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करत आहे. जेणेकरून त्याच्या मृत्यूचे योग्य कारण कळू शकेल.  वर्सोव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार म्हणाले की, आज दुपारी 12.30 वाजता पोलीस नियंत्रणाला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, यारी रोडवर असलेल्या इनलक्स नगर सोसायटीच्या डी विंग 13 क्रमांकाच्या खोलीत दुर्गंधी येत आहे, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डुप्लिकेट चावीने घर दरवाजा उघडला. पाहिले शौचालयाचा वास येत होता आणि शौचालयाचा दरवाजा उघडा होता, अभिनेत्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शौचालयात होता, जो पूर्णपणे कुजलेला होता.

32 वर्षीय ब्रह्मा मूळचा भोपाळचा!

ललितच्या पात्रामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला ब्रह्मा मिश्रा हा फक्त 32 वर्षांचा होता. भोपाळमधील रायसेन येथील रहिवासी असलेला ब्रह्मा केवळ दहावीपर्यंत शिकलेला होता. त्याचे वडील भूविकास बँकेत कार्यरत होते. ब्रह्माने मिर्झापूरसह केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

2013 मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ मधून डेब्यू

मिर्झाने चित्रपटाची कारकीर्द 2013 पासून सुरु केली होती. त्याने ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटात सर्वप्रथम काम केले. तर 2021 मध्ये तापसी पन्नीसोबत त्याने ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटात काम केले.

इतर बातम्या-

param bir singh: अखेर परमबीर सिंग पोलीस खात्यातून निलंबित; राज्य सरकारचा मोठा निर्णय

नशीबच पालटलं! IIT च्या विद्यार्थ्याला उबरकडून थेट 2 कोटींपेक्षा जास्त पगाराची ऑफर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.