तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. तर मग काँग्रेसची सत्ता बरी – उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज हे मत मिळवणारे मशीन नाहीये. ते आमचं दैवत आहे. प्रभू रामचंद्रांसोबत वानर सेना होती. त्यांना आम्ही देव मानतो. छत्रपती देखील नसते तर आज आपण नसतो. शिवाजी महाराजांनी ही दैत्य मारले. भाजप केवळ मतांसाठी पुतळा उभारला. पण त्यातही पैसा खालला. पुतळा कोसळून पडला.

तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. तर मग काँग्रेसची सत्ता बरी - उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 8:32 PM

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है. हे बांगलादेशाला बोलत आहेत. बांगलादेशात काय चाललंय. अहो तुमचे लोक काय करत आहे. मला गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे. संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता. त्यात पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार. एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे.’

‘गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात.’

‘प्रत्येक राज्यात मंदिर उभारले पाहिजे. त्या मंदिरावर शिवाजी महाराजांचे मंत्र कोरले जातील. केवळ शिवजयंतीला पुतळे पुसायचे एवढ्या पुरते आम्ही मर्यादित नाही. मोदीजी तुम्हाला आणि मिंध्यांना शिवाजी महाराज मतं मिळवणारं यंत्र वाटत असेल. ते काही ईव्हीएम नाही. ईव्हीएम सारखं महाराजांना मानू नका. मी महाराजांना देव मानतो. जो मंदिराला विरोध करेल त्याला लोक बघून घेतील. शिवाजी महाराजांचं मंदिर नाही बांधायचं तर मोदींचं बांधायचं का.’

‘मला संघाबद्दल, भागवत यांच्याबद्दल आदर आहे. पण ते जे काही करत आहेत. त्याचा आदर नाही. तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या कुणाबद्दल सांगत आहात. तुम्ही म्हणता हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. मग दहा वर्षापासून विश्वगुरू बसलाय. अजून संरक्षण नाही करू शकला.’

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.