मुंबई: खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. (Cabinet Minister Subhash desai appointed committee to probe mining tender process)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपुरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यिय समिती गठित केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँक घोटाळ्यासंदर्भात विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना भाजप नेते प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरु झाली म्हणून प्रविण दरेकर (Pravin Darekar) गायब झाले, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, प्रविण दरेकर हा गायब होणार नेता किंवा कार्यकर्ता नाही, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी विरोधकांना ठणकावले. (BJP leader Pravin Darekar on mumbai bank scam)
ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. या पत्रकारपरिषेदला मुंबै बँकेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. एक वर्तमानपत्र आणि एकाच वृत्तवाहिनीवरुन मुंबै बॅंकेबद्दल वारंवार बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र, कोण काय लिहतंय किंवा बातम्या दाखवतंय यापेक्षा बँकेचे सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आज खरी बाजू मांडण्यासाठी आपण पत्रकारपरिषद घेतल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
मुळात मुंबै बँकेत 123 रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी कुठून आली ते कळू द्या. फक्त राजकीय सुडपोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. प्रकाश सोळंकी यांनी जाणीवपूर्वक चौकशी लावून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश सुर्वेही राजकीय सुडापोटी आरोप करून काही हाती लागतंय का, हे बघत आहेत. पण यामधून काहीच साध्य झाले नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.
(Cabinet Minister Subhash desai appointed committee to probe mining tender process)