Congress  : आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करा, काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर आंदोलन

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराज आहे.

Congress  : आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करा, काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर आंदोलन
आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करा
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:51 PM

मुंबई : मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच राहावे. आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उद्या आंदोलन करण्यात येणाराय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Congress Committee) पर्यावरण विभागातर्फे रविवार सकाळी 10 वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे (Environment Department) प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक (Sameer Subhash Vartak) यांनी दिली आहे. मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरचे जंगल आहे. जगात नैसर्गिक जंगल असलेले मुंबई हे एकमेव शहर आहे.

पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी

ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. चार ऑक्टोबर 2019 रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील समस्त जनता व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराज आहे.

जंगल वाचवण्यासाठी हातभार लावा

पर्यावरण व हवामान ढासळत असताना अशा तुघलकी निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात रविवारी आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. या आंदोलनात सर्व पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा, पर्यावरण वाचवा’ या आंदोलनात सहभागी व्हावे होऊन आरेचे जंगल वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहनही समीर वर्तक यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.