Deepali sayed: दिपाली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; पंतप्रधानांबाबतचं ‘ते’ ट्विट भोवलं
अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. दिपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali sayed) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) आक्षेपार्ह भाषेत टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. दिपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील (Mumbai) ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा —- (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने दिपाली यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली सय्यद या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. भाजप, मनसेच्या नेत्यांवर त्या अनेक मुद्द्यांवरून चौफेर फटकेबाजी करताना दिसतात. मात्र आता त्यांना त्यांचंच ट्विट महागात पडलं आहे.
दिपाली सय्यद यांचं ट्विट-
यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल. @ShivSena pic.twitter.com/vqvvFuO875
— Deepali Sayed (@deepalisayed) May 27, 2022
“नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. “तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, पण आरक्षण द्या!”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावरूनही दिपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवला होता. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. शिवाय “वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”, असंही त्या म्हणाल्या आहेत.