जितेंद्र आव्हाड यांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; सिंधी समाज आक्रमक, पोलिसात गुन्हा दाखल
उल्हासनगरनंतर सोलापूर जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे आणि काही माणसं हे जाणीवपूर्वक करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप सिंधी समाजाने केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्त्यव्यावरून सिंधी समाजाने त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने आणि त्यांचा निषेध नोंदवण्यात आला होता. तर सोलापूर जिल्ह्यातही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाबद्दल बोलताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात बोलतना त्यांनी म्हटले होती की, “एक शेर को मारने के लिए सौ सिंधी कुत्ते भी आ गए तो कुछ भी नही कर सकते” या त्यांच्या वक्तव्यावरून ही सिंधी समाजाने त्यांच्याविरोधात हिललाईन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, एक शेर को मारने के लिए सौ जंगली कुत्ते भी आ गए तो कुछ भी नही कर सकते असं त्यामध्ये म्हटले असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यावरून आता सिंधी समाजा आक्रमक झाला आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे आणि काही माणसं हे जाणीवपूर्वक करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.