अनिल देशमुखांबाबतचं सत्य, असत्य काय?, सीबीआयने खुलासा करावा; नवाब मलिक यांची मागणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला सवाल केला आहे. (nawab malik)

अनिल देशमुखांबाबतचं सत्य, असत्य काय?, सीबीआयने खुलासा करावा; नवाब मलिक यांची मागणी
नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 1:01 PM

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला सवाल केला आहे. देशमुखांबाबत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा. ही सीबीआयची जबाबदारी आहे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. (cbi should explain about anil deshmukh related viral documents, says nawab malik)

आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. सीबीआयच्या प्राथमिक अहवालाच्या बातम्या आज काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत तर सोशल मीडियावर तो अहवाल पीडीएफमध्ये फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

ती मीडियाची जबाबदारी

या देशात खोट्या बातम्यांचा व्हायरसारखा फैलाव होतोय. शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाहीत. ती मीडियाने शोधून काढली पाहिजे. ही मीडियाची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सूडबुद्धीने कारवाई होऊ शकत नाही

हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होवू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणि ही बातमी खोटी आहे याबाबतचा खुलासा सीबीआयने करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्या कागदपत्रांची चौकशी करा

या अहवालाबाबत सीबीआय सोडून कोणीही खरं की खोटं सांगू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे कागद व्हायरल झालेत. लोक यावर विश्वास ठेवतील, नाही ठेवतील माहीत नाही. आता सीबीआयची जबाबदारी आहे की त्यांनी या बाबतीत खुलासा केला पाहिजे. सही आहे नाही आहे हा वेगळा विषय आहे. त्यांच्यावर या आधीसुद्धा आरोप झाले. त्यावेळी बिनासहीचे कागद फिरत होते आणि त्यानंतर सह्या समोर आल्या. हे कागद सत्य आहे की असत्य याचा खुलासा आता सीबीआय करू शकते. जर हा अहवाल खोटा असेल तर त्यांच्यावर चौकशी करून यामागे कोण असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं. (cbi should explain about anil deshmukh related viral documents, says nawab malik)

संबंधित बातम्या:

VIDEO: बाळासाहेबांच्या जीवाला धोका, पवारांनी सांगितलं ‘मातोश्री’ सोडा, तेव्हा साहेबांनी मलाच बोलावलं; राणेंनी सांगितला ‘तो’ अनुभव

100 कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर? : सचिन सावंत

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, पक्षनेतृत्वावर आरोप करत बड्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

(cbi should explain about anil deshmukh related viral documents, says nawab malik)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.