फुकट्यांकडून 100 कोटींची वसुली! रेल्वेचा मोठा महसुली तोटा वाचला

मध्य रेल्वेने कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करताना सरकारच्या निर्देशांनुसार आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवताना, चुकीचे वर्तन करणाऱ्या प्रवाशाला दंड करण्यात अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम केले आहे, ज्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल तोटा वाचला आहे.

फुकट्यांकडून 100 कोटींची वसुली! रेल्वेचा मोठा महसुली तोटा वाचला
लोकल ट्रेन (प्रातिनिधिक छायाचित्र)
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 8:34 PM

मुंबई : तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेने 100.82 कोटी रुपये महसुलाची बचत केली आहे. मध्य रेल्वेत 1 एप्रिल ते 6 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अनियमित प्रवासाची 17.22 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच, मध्य रेल्वेच्या स्पेशल टीमने 29 हजार 19 व्यक्तींना कोविड-19 योग्य वर्तन न पाळल्याबद्दल शोधून त्यांना दंड ठोठावला आहे. मध्य रेल्वेने कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करताना सरकारच्या निर्देशांनुसार आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवताना, चुकीचे वर्तन करणाऱ्या प्रवाशाला दंड करण्यात अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम केले आहे, ज्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल तोटा वाचला आहे. (100 crore fine from Central Railway for Travel without a ticket and passengers violating Corona rules)

उत्पन्नाच्या बाबतीत भुसावळ विभागाची विक्रमी रुपये 33.74 कोटी महसुली बचत झाली आहे. त्यानंतर मुंबई विभाग रुपये 33.20 कोटी, नागपूर विभाग रुपये 16.73 कोटी आणि सोलापूर, पुणे विभाग आणि मुख्यालये रुपये 17.15 कोटी प्राप्त झाले आहेत. प्रकरणांच्या (cases) बाबतीत, मुंबई विभागात 6.83 लाख प्रकरणे, त्यानंतर भुसावळ विभाग 4.68 लाख प्रकरणे, नागपूर विभाग 2.51 लाख प्रकरणे आणि सोलापूर, पुणे विभाग 3.20 लाख प्रकरणे यांचा क्रमांक लागतो.

‘एकूण 29 हजार 19 प्रकरणे शोधून त्यांना दंड ठोठावला’

दि. 1 एप्रिल, 2021 ते 6 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी कोविड-19 योग्य वर्तनाचे पालन न केल्याची एकूण 29 हजार 19 प्रकरणे शोधून त्यांना दंड ठोठावला. मुखपट्टी/फेस कव्हर न घातलेल्या प्रवाशांची एकूण 23 हजार 816 प्रकरणे आणि कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवास करण्यास परवानगी नसलेल्या प्रवाशांची 5 हजार 203 प्रकरणे आढळून आली. आणि त्यांच्याकडून अनुक्रमे रुपये 39.68 लाख आणि रुपये 26.02 लाख दंड वसूल करण्यात आला.

प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन

बोनफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याच्या आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय आणि उपनगरीय / मेल एक्सप्रेस विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि कोविड-19 च्या अनुषंगाने सखोल मोहीम राबवली आहे. आपले कर्तव्य बजावत असताना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या वागणुकीमुळे तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यांनी अनेक प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्रीत भेट करवून त्यांची सहृदयी बाजू देखील प्रदर्शित केली आहे. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड-19 साठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.

इतर बातम्या :

आधी तुरुंगातील जेवण घ्या, अनिल देशमुखांना कोर्टाने फटकारले; घरचे जेवण देण्याची मागणी फेटाळली

‘..तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही’, आशिष शेलारांचा नवाब मलिकांना इशारा

100 crore fine from Central Railway for Travel without a ticket and passengers violating Corona rules

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.