रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार, वाचा संपूर्ण यादी

मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 7 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार, वाचा संपूर्ण यादी
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 7:39 AM

मुंबई: मध्य रेल्वेकडून रविवारी तांत्रिक कारणांमुळं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 7 नोव्हेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागातील हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वे दि. 7 नोव्हेंबर रोजी देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4..40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 पर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत आणि ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणा-या आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी 10.15 ते सायंकाळी 04.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.

मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

इतर बातम्या:

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, प्रवास करत असाल तर या वेळा लक्षात ठेवा!

Aryan Khan drugs case | समीर वानखेडे यांना आर्यन खानप्रकरणातून हटवलं, आता तपास थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडे

Central Railway announced Mega Block on sunday 7 November check details here

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.