दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक एका क्लीकवर
मध्य रेल्वे विभागात 5 सप्टेंबर (रविवार) रोजी देखरेखीचे काम करण्यात येत असल्यामुळे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक संचालित केला जाईल.
मुंबई : मध्य रेल्वे विभागात 5 सप्टेंबर (रविवार) रोजी देखरेखीचे काम करण्यात येत असल्यामुळे उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक संचालित केला जाईल. परिणामी लोकल रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. (Central Railway announces mega block in suburban area know all about new train time table)
ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि ठाणे आणि कल्याण स्थानकांमधील सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा त्यांच्या गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
जलद सेवा कल्याण, ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील
कल्याण येथून सकाळी 10.26 ते दुपारी 3.19पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. या सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगब्लॉक असेल.
वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेलकरीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल, कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील
पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीदरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. वरील माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जारी करण्यात आली आहे.
इतर बातम्या :
नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार! 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्याचे आदेश
मुंबईत दररोज 2000 किलो कचऱ्यापासून वीज निर्मिती होणार; आदित्य ठाकरेंकडून प्रकल्पाचे लोकार्पण
भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा अवधी
(Central Railway announces mega block in suburban area know all about new train time table)