Mega Block : 18 तासांनंतर आता मध्य रेल्वेचं 72 तासांच्या मेगाब्लॉकचं नियोजन? प्रवाशांचे होणार हाल

मध्य रेल्वे(Central Railway)कडून काल ठाणे (Thane) ते दिवा (Diva) कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक (Mega Block)घेण्यात आला आहे.

Mega Block : 18 तासांनंतर आता मध्य रेल्वेचं 72 तासांच्या मेगाब्लॉकचं नियोजन? प्रवाशांचे होणार हाल
Mumbai Local
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 10:52 AM

मुंबई : मध्य रेल्वे(Central Railway)कडून काल ठाणे (Thane) ते दिवा (Diva) कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक (Mega Block)घेण्यात आला आहे. यादरम्यान ठाणे ते दिवा मार्गावरच्या लोकलसेवा तब्बल 18 तासांसाठी बंद होत्या. सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गैरसोय होणारा आणखी एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 72 तासांचा असणार आहे.

मध्य रेल्वेचं नियोजन मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वेगळी मार्गिका असावी, या हेतूने पाचवी, सहावी मार्गिका असणार आहे. 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं नियोजन मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) आणि मध्य रेल्वेकडून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. कालच्या मेगाब्लॉकमध्ये जवळपास ५०० कामगार आणि मध्य रेल्वे, एमआरव्हीसीचे १०० पर्यवेक्षक काम करत होते. त्यामुळे वाहतूक जलग मार्गावर वळवण्यात आली होती. तसेच या काळात लोकसोबतच काही एक्सप्रेस गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या. यामध्ये मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मुंबई-गदग एक्सप्रेस, मुंबई-नांदेड एक्सप्रेस,मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश होता. प्रवाशांची गैरसोय  टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वे विभागानं आपल्या निवेदनामध्ये म्हटलं होतं.

तात्पुरता मार्ग या मार्गिकेचं काम पूर्ण होण्यासाठी कळवा ते मुंब्रा डाऊन धिम्या मार्गावरच्या लोकल आजपासून नवा मार्ग आणि 1.6 लांबीच्या नव्या बोगद्यातून चालवण्यात येणार आहे. पाचव्या, सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईपर्यंत हा तात्पुरता मार्ग असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलंय.

ठाणे-दिवा कॉरिडॉरदरम्यान मेगाब्लॉक; लोकलसेवा 18 तासांसाठी ठप्प, अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द

Election: ताई पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये होत्या, दादा 32 व्या नंबरचे मंत्री! पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोमणा

Bhiwandi Murder | मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.