Local : ठाणे ते दिवा दरम्यान 36 तासांचा मेगाब्लॉक, एक्स्प्रेसही रद्द; पर्यायी व्यवस्था काय?
ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) घेण्यात आला आहे.

मुंबई : ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Block) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहील. आज दुपारी दोन वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहेत.
ब्लॉक दरम्यान ठाणे कल्याण दरम्यान धिमी लोकल सेवा बंद
मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. या मार्गिकेवरील जलद लोकल सेवा मात्र सुरु असणार आहे. ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणरा आहे.36 तासाात मुख्य मार्गावरील 390 लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत. फास्ट लोकल सुरु ठेवण्यासाठी लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
कोणत्या ट्रेन्स रद्द?
7 आणि 8 जानेवारी
अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
8 जानेवारी आणि 9 जानेवारी
जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस, डेक्कन क्विन एक्सप्रेस, मुंबई अमरावती एक्स्प्रेस, नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, गदग एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
9 आणि 10 जानेवारी
अदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस,गदग एक्स्प्रेस
पुण्याला प्रवास संपणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या
हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस
पुण्याहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या
हुबळी दादर एकस्प्रेस, कोयना एक्स्प्रेस
लोकल सेवेतील आजचे बदल
आज दुपारी 1 ते 2 दरम्यान कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या अर्ध जलदल लोकल कलण्याण ते माटुंगा रम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेतय यादरम्यानं ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थनाकवर थांबा नसेल.
ठाणे आणि दिवा धिम्या मार्गांवर पायाभूत सुविधांसाठी ३६ तासांचा मेगा ब्लॉक. ब्लॉकची तारीख आणि वेळ: दि. ०८.०१.२०२२ दुपारी २ वा.पासून ते ९/१०.०१.२०२२ च्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत अधिक महितीसाठी इथे वाचा.? https://t.co/MqBqnF1m8n pic.twitter.com/ne9NaCWtCq
— Central Railway (@Central_Railway) January 7, 2022
अप धिम्या सेमी फास्ट लोकल कल्याण आणि मुलुंड अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा येथे त्या थांबणार नाहीत. या लोकल 10 मिनिट उशिरानं धावतील.
आज दुपारी दादरहून 12.54 ते 1.52 दरम्यान डाऊन धिम्या सेमी फास्ट लोकल मुलुंड कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकूर या स्थानकांवर थांबा नसेल.
पर्यायी व्यवस्था काय
मध्य रेल्वेने ब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका आणि एसटी महामंडळाला जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. 08 जानेवारी ते 10 जानेवारी 2022 या कालावधीत मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने ठामपाच्या परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेण्याचे परिवहन सेवेकडून आवाहन करण्यात आलंय. ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी 5 मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात 230 बसफेऱ्या आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा या मार्गावर 10 मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात 102 बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
इतर बातम्या:
Central Railway take 36 hour Mega Block during Thane to Diva station for work of Thane Kalva slow lines