AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Central Railway Update | मध्य रेल्वे विस्कळीत, किती मिनिट उशिराने धावतायत ट्रेन?

Central Railway Update | मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रेन्स उशिराने धावत आहेत. लोकल प्रवासाला होणाऱ्या या विलंबामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.

Central Railway Update | मध्य रेल्वे विस्कळीत, किती मिनिट उशिराने धावतायत ट्रेन?
Mumbai LocalImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 12:01 PM

मुंबई : मुंबई लोकलला लाईफलाइन म्हटलं जातं. मोठ्या संख्येने मुंबईकर लोकल सेवेवर अवलंबून असतात. अशावेळी मुंबईची लोकल सेवा कोलमडली तर नोकरदारांचे चांगलेच हाल होतात. अगदी काही मिनिटांच्या विलंबामुळे सगळ्या दिवसाच वेळापत्रक कोलमडत. मुंबईकरांच दिवसाच वेळापत्रक लोकलच्या वेळेनुसार ठरतं. ठरलेल्या वेळेला लोकल पकडायची. ती ठरलेल्या वेळेत पोहोचणार. कामावरुन निघाल्यानंतरही तसच नियोजन असतं. यात मध्ये सिग्नल यंत्रणा किंवा अन्य कारणांमुळे बिघाड झाला, तर मुंबईकरांचे हाल होतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलवर प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. दररोज 70 ते 75 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. नोकरीसाठी अगदी कर्जत-कसाऱ्यावरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.

सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. निदान उत्सव काळात तरी लोकल सेवा सुरळीत सुरु रहावी, अशी अपेक्षा असते. पण आज बुधवारी मध्य रेल्वे विस्कळीत झालीय, बदलापूरवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. स्टेशनवर ट्रेन उशिराने धावत असल्याची घोषणा करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. बदलापूरवरून अंबरनाथच्या दिशेने 10:40 ला येणारी ट्रेन 11.05 ला आल्याने रेल्वे प्रवाशी संतप्त आहेत. ….म्हणून लोकल सेवा मुंबईची लाईफलाइन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लोकल सेवा ही मुंबईचा कणा आहे. मुंबईत बऱ्याच गोष्टी लोकलवर अवलंबून असतात. लोकलच्या वेळेत बदल झाला किंवा बिघाड झाला, तर मुंबईकर अक्षरक्ष: हैराण होतात. एखाद्या लोकलला काही मिनिट जरी उशिरा झाला, तरी लगेच रेल्वे स्थानकात गर्दी होते. मग उशिराने धावणाऱ्या लोकलमध्ये मुंगीलाही शिरायला वाव नसतो. अशा परिस्थितीत मुंबईकरांना काहीवेळा प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकल सेवेला मुंबईची लाईफलाइन म्हटलय.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.