Harbour Line वरती आज मेगाब्लॉक, जाणून घ्या दिवसभरातलं रेल्वेचं वेळापत्रक
मध्य रेल्वेने (central railway) आज देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर लाईनच्या (houbour line) उपनगरीय विभागात मेगाब्लॉक (mega block)आयोजित केला आहे.
मुंबई – मध्य रेल्वेने (central railway) आज देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर लाईनच्या (houbour line) उपनगरीय विभागात मेगाब्लॉक (mega block)आयोजित केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण स्थानकादरम्यानच्या मुख्य मार्गावर कसल्याही प्रकारचा मेगा ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वे पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) स्थानकादरम्यान विशेष सेवा चालवणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
Mega Block on Harbour Line on 20.3.2022.
No Mega Block on CSMT-kalyan main line pic.twitter.com/QbPDDO26BK
— Central Railway (@Central_Railway) March 19, 2022
ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द
पश्चिम रेल्वेकडून सुध्दा आज सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी जंबो ब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिध्द केलेल्या माहितीनूसा अंधेरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सात तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान 5व्या मार्गावर 10 ते 3.30 पर्यंत साडेपाच तास ब्लॉक असेल सर्व अप आणि डाउन फास्ट मार्गावरील उपनगरीय गाड्या अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येतील.याबाबतची तपशीलवार माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे
WR to undertake Jumbo Block between Andheri & Goregaon stations as well as between Ram Mandir & Jogeshwari stations on Sunday, 20th March, 2022 inorder to carry out maintenance work of tracks, signalling and overhead equipment.@RailMinIndia@drmbct pic.twitter.com/fAWsHC2SC6
— Western Railway (@WesternRly) March 17, 2022
नेमका कुठे ? कोणत्या वेळेत आहे मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वा.
- चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वांद्रे/गोरेगावपर्यंतची डाऊन हार्बर सेवा सुरू राहील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.