Weather Update: पुढील चार दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आठवडाभराच्या थंडीनंतर मध्य भारतातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हवामान दमट राहणार आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.

Weather Update: पुढील चार दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी
महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:47 PM

मुंबई : मागील वर्षभरात अधूनमधून रिपरिप सुरु ठेवणाऱ्या पावसाने नवीन वर्षातही तेच सत्र सुरु ठेवले आहे. आज नव्या वर्षांच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसाने मुंबई शहरासह उपनगरांमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा देशाच्या उर्वरित भागात परिणाम झाला असून पुढील चार दिवस पावसाचे असतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

हवामान खात्याने काय म्हटलेय?

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आठवडाभराच्या थंडीनंतर मध्य भारतातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हवामान दमट राहणार आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. आजपासून म्हणजेच 8-11 जानेवारीदरम्यान मध्य प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच रविवार ते मंगळवार, 9-11 जानेवारी या कालावधीत छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या विदर्भ परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येईल. याशिवाय आज पश्चिम मध्य प्रदेश, आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेश तसेच सोमवार आणि मंगळवारी छत्तीसगडमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतात 5 दिवसांच्या पावसाचा अंदाज

IMD ने आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. रविवारी मध्य प्रदेश तसेच सोमवार ते बुधवार संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगढसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील परिस्थितीचा प्रभाव

हवामानातील या बदलाला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये येणाऱ्या उच्च पातळीची आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य भारतावर दोन्ही बाजूंनी वाऱ्यांचा संगम सुरू राहील. मध्य पाकिस्तानस्थित पश्चिम विक्षोभ तसेच नैऋत्य राजस्थानवर त्याच्या प्रेरित चक्रीवादळाचा प्रभाव असेल. एकत्रितपणे या प्रणालींमुळे या आठवड्याच्या शेवटी उत्तर आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. (Chance of rain for next four days in some parts including Maharashtra)

इतर बातम्या

Omicron : ओमिक्रॉनची धास्ती! ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या- एकनाथ शिंदे

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, कायदेशीर कारवाईचाही इशारा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.