आपण एकत्र यायला पाहिजे… संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य…राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली.

आपण एकत्र यायला पाहिजे... संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटील यांना उद्देशून वक्तव्य...राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
sanjay raut chandrakant patil
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 3:15 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीकडे तमाम राजकारण्याचे लक्ष लागले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे कोणाची विकेट पडणार? हे आज संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीनिमित्त कधीकाळी एकत्र असलेले अनेक जुने सहकारी एकमेकांना भेटले. या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत विधिमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी त्यांची आणि भाजप नेते चंद्राकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीवेळी आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून म्हटले. त्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली. राऊत यांच्या वक्तव्यानंतर दोन जुने मित्रपक्ष पुन्हा एकत्र येणार की काय? या चर्चेला उधान आले आहे.

अशी बदलत गेली परिस्थिती

राज्यात २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. या युतीला जनतेने बहुमत दिले. परंतु निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली आणि युती तुटली. त्यानंतर भाजपने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सरकार काही तासांमध्ये पडले. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना गेली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.

शिवसेनेत बंड अन् भाजप-शिवसेना उबाठात हल्ले-प्रतिहल्ले

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना मिळाले. जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारणात आणखी एक भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला. ते भाजपसोबत गेले. त्यामुळे शिवसेना दोन गट तयार झाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उबाठा असे नाव घ्यावे लागले. त्यानंतर भाजप आणि शिवसेना उबाठा एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. खासदार संजय राऊत नियमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ले करत आहेत. त्या विधान परिषद निवडणूक निमित्ताने संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. त्या भेटीत आपण एकत्र यायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा बदलणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.