दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील

दोन वर्षे झाली आमची म्हातारी मुलीला भेटाला गेली नाही. मुलगीही म्हातारीला भेटायला आली नाही, असं सांगतानाच लॉकडाऊन ठेवायचा की नाही? (chandrakant patil attacks maha vikas aghadi over lockdown)

दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:09 PM

मुंबई: दोन वर्षे झाली आमची म्हातारी मुलीला भेटाला गेली नाही. मुलगीही म्हातारीला भेटायला आली नाही, असं सांगतानाच लॉकडाऊन ठेवायचा की नाही? हे काय ते एकदा ठरवा. पण काहीही निर्णय घेताना माणसाचा माणूस म्हणून विचार करा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. (chandrakant patil attacks maha vikas aghadi over lockdown)

चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना हे आवाहन केलं आहे. कोविड हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे त्यावर सरसकट भाष्य करता येणार नाही. यातलं तारतम्य सांभाळलं पाहिजे. किती दिवस आपण निर्बंध ठेवणार आहोत. ज्यांचे लसीकरण झालं आहे त्यांना मुभा दिली पाहिजे. दुकानं उघडली पाहिजे की नाही, मंदिरं उघडली पाहिजे की नाही, टुरिजम सुरू करायचं की नाही काही तरी ठरवा ना. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? दोन डोस नंतरचा धोका हा मर्यादित आहे. आता जनजीवन सुरू केलं पाहिजे. नाही तर लोकं वेडी होतील. दोन वर्षे झाली आमची म्हातारी लेकीला भेटायला गेली नाही. लेकही म्हातारीला भेटायला आली नाही. वारकरी पंढरीला गेला नाही, असं सांगतानाच काय निर्बंध आहेत ते लावण्याआधी माणसाचा माणूस म्हणून आधी विचार करा, असं पाटील म्हणाले.

29 जुलैचा मेळावा त्यात बसेल का?

धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेच धोरण करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जी विनंती केली आहे. त्यावर पंतप्रधान विचार करतील. त्यातून काही प्रोटोकॉल किंवा आचारसंहिता ठरली तर 29 जुलै रोजी होणारा काँग्रेसचा मेळावा त्यात बसतो का? हे बघण्याची जबाबदारी सरकारची आहे. मोदींकडून तुम्ही धोरण ठरवण्याची अपेक्षा करत आहात. मोदी धोरण ठरवतीलही. पण त्या धोरणात हा मेळावा बसेल का हे तुम्ही बघा, असा चिमटा त्यांनी काढला.

आम्ही कुणासोबतही जायला तयार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबसी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. तो मेळावा महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील आहे. महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा मेळावा असेल. आम्हीही ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन केलं. परंतु, ओबीसी आरक्षणाबाबत त्यांचा रोख जर केंद्र सरकारकडे असेल तर याचा अर्थ त्यांना कायदा कळत नाही असा होतो, असं सांगतानाच ते या मेळाव्यासाठी सर्व पक्षीयांना आमंत्रण देणार असतील तर आम्ही कुणासोबतही जायला तयार आहोत. शेवटी ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, असंही ते म्हणाले.

राठोडांना मंत्री करावं की नाही हा शिवसेनेचा विषय

शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणं चिंताजनक आहे. पण हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. त्यांच्यावर आरोप आहेत की नाही हे चारही बाजूने पाहून घ्या. राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकूल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटतं, असं ते म्हणाले.

साखर कारखान्यांना पॅकेज द्या

वैद्यनाथ साखर कारखान्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केवळ वैद्यनाथच नाही तर तीन चतुर्थांश कारखान्यांनी कामगारांचे पगारच दिले नाहीत. विमा काढला नाही. त्यांचा पीएफ भरला नाही. बँकेचे हप्ते भरले नाहीत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नीट पॅकेज दिलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. (chandrakant patil attacks maha vikas aghadi over lockdown)

संबंधित बातम्या:

8 ते 10 जिल्ह्यात अजूनही संसर्ग, 3 कोटी जादा डोस द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

राज्यमंत्री बच्चू कडूंची नाशिक कोर्टात हजेरी, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप

2 सरकारी बँकांचं खासगीकरण, RBIच्या माजी डेप्युटी गव्हर्नरनी सांगितली ही बाब

(chandrakant patil attacks maha vikas aghadi over lockdown)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.