‘मिशन नवाब मलिक’ कसं राबवलं?, एक व्हिडीओ कॉल केला अन्… चंद्रकांतदादांनी सांगितला प्लान

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्यामुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आणि दुसऱ्या दिवशी भाजपने मलिकांविरोधात आंदोलन सुरू केलं. राज्यभरात मलिकांचे पुतळे जाळले गेले. पण हे कसे घडले? त्यासाठी काय करण्यात आलं? त्या दिवशी पडद्यामागे नक्की काय घडलं होतं. याचा वृत्तांतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत […]

'मिशन नवाब मलिक' कसं राबवलं?, एक व्हिडीओ कॉल केला अन्... चंद्रकांतदादांनी सांगितला प्लान
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 7:00 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्यामुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आणि दुसऱ्या दिवशी भाजपने मलिकांविरोधात आंदोलन सुरू केलं. राज्यभरात मलिकांचे पुतळे जाळले गेले. पण हे कसे घडले? त्यासाठी काय करण्यात आलं? त्या दिवशी पडद्यामागे नक्की काय घडलं होतं. याचा वृत्तांतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितला. निमित्त होतं भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीचं.

कालपरवाच नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण दिला. आदल्या दिवशी 9 वाजता एका व्हिडीओ कॉलवर आपण हा कार्यक्रम दिला. दुसऱ्या दिवशी 26-27 मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले. मलिकांचा पुतळा जाळला गेला नाही, अटक केली नाही असं झालं नाही. इतकं कमी वेळात प्लानिंग झालं, असं त्यांनी सांगितलं. तसेच, इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. 400 हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली. निवेदने देण्यात आली, असंही पाटील यांनी सांगितलं.

पोलिसांवर हल्ले होतात तरीही चिंता नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. राज्यात सामुहिक बलात्काराच्या दुःखदायक घटना घडत आहेत. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचे काही वाटत नाही. त्रिपुरात घटना घडल्याच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी पंधरा – वीस हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात. याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपावर आरोप करतात. अमलीपदार्थांचे समर्थन केले जाते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असंही ते म्हणाले.

मोदींच्या नेतृत्वात भारत सक्षम

राज्यात प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणे ही आपली भूमिका आहे. पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलने झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपाचा सक्रीय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदीजींच्या नेतृत्वामुळे साठ सत्तर देशांना कोरोनाची लस निर्यात करत आहे, असे ते म्हणाले.

हिंमत असेल तर निवडणुका घ्या

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमीवर हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदू समाजाचा अपमान केला जातो. सत्ताधारी पक्ष हिंदुत्व सोडून परिवार पार्टी झाला आहे. परिवाराचा विकास आणि महाराष्ट्राचा विनाश चालू आहे, हे दुर्दैव आहे. राज्यातील जनता दुःखी आहे आणि जनविरोधी सरकारला हटवायला उत्सूक आहे. हे नागरिकविरोधी सरकार लवकरच हटेल असा आपल्याला विश्वास आहे, असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी सांगितलं. राज्यातील जनतेने 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मते दिली. पण शिवसेनेने विश्वासघात केला. आता राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. आपले त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्या, भाजपा निवडणूक जिंकेल, असा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

राजकीय जीवनात अनेक धमक्या आल्या, पण त्याचा परिणाम नाही, गडचिरोलीतील तरुणांसाठी काम करणार: एकनाथ शिंदे

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.