पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले

राज्यासह देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. (chandrakant patil refuse maha vikas aghadi leader's allegations)

पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 2:31 PM

मुंबई: राज्यासह देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आघाडीच्या नेत्यांचा हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्राने सवलत दिल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या जागा 6वरून वाढून 7 झाल्या. याखेरीज भाजपाच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या 10वरून 8 झाली. तरीही भाजपाची पिछेहाट झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

आसाम, गोव्याला परवडते महाराष्ट्राला का नाही?

मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये सवलत दिली आहे. आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे, असे असंही त्यांनी सांगितलं.

राज्याने केवळ कर वसुली करावी का?

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून दिलासा द्यावा, अशी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी कांगावा करून सर्व सवलत केंद्रानेच द्यावी असे सांगितले आहे. हा धक्कादायक प्रकार आहे. सर्व जबाबदारी केंद्रानेच पार पाडावी आणि राज्याने केवळ कर वसुली करावी, हे चालणार नाही, असं ते म्हणाले.

तिन्ही पक्षांचा ढोंगीपणा उघड

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने केली. पण आता केंद्राने सवलत दिल्यानंतर राज्यात व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल डिझेलचा दर आणखी कमी करण्यात सत्ताधारी आघाडीकडून टाळाटाळ सुरू झाली आहे. या तीनही पक्षांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. या पक्षांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसून केवळ केंद्र सरकारवर सातत्याने जबाबदारी ढकलायची आहे हे स्पष्ट झाले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

Ahmednagar Hospital Fire Live : अहमदनगर रुग्णालयाच्या आगीची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल

(chandrakant patil refuse maha vikas aghadi leader’s allegations)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.