… तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका

भाजपच्या वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला. (chandrakant patil slams anil deshmukh)

... तर तुम्हीही बदनामीकारक मजकूर ट्विटमध्ये वापरला नसता; चंद्रकांतदादांची गृहमंत्र्यावर टीका
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 1:24 PM

मुंबई: भाजपच्या वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये मूळ ट्विटमधील आक्षेपार्ह मजकूर वापरल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर टीका केली आहे. गृहमंत्रीजी. महिला सन्मानाचा कळवळा असता तर तो बदनामीकारक मजकूर तुम्ही ट्विटमध्ये वापरला नसता, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. (chandrakant patil slams anil deshmukh)

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. याच्यामागे कोण आहे हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चौकशीतून तथ्य समोर येईल

तर, खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होता कामा नये. हा एका महिलेशी संबंधित प्रश्न आहे. चौकशीतून तथ्य समोर येईलच, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला काल संध्याकाळी झाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.

देशमुखांनी काय केलं होतं ट्विट?

भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. (chandrakant patil slams anil deshmukh)

गुन्हेगाराला शिक्षा करा

कोणत्याही महिलेच्या विरुद्ध कुणी असे आक्षेपार्ह टाकत असेल तर त्याची चौकशीच नव्हे तर त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. कारण महिलेचा सन्मान ठेवणारे आमचे राज्य आणि देशही आहे. त्यामुळे असा चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाकायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. (chandrakant patil slams anil deshmukh)

संबंधित बातम्या:

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा

वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख भाजपकडून नाही, रक्षा खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांशी चर्चा

चावटपणा करणाऱ्याला आत टाका, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटलांचा संताप

(chandrakant patil slams anil deshmukh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.