कुणालाच कुणाचा धाक नाही, राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू; चंद्रकांतदादांची टीका
भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. (chandrakant patil slams maharashtra government over crime incidents in maharashtra)
मुंबई: राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. (chandrakant patil slams maharashtra government over crime incidents in maharashtra)
भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या काळात आंदोलनं झाली. त्यामुळे सरकारमध्ये बदल झाले. त्यानंतर महाराष्ट्र स्थिर झाला. राज्यात कायद्याची भीती निर्माण झाली होती. राज्याचं गुन्हेगारीकरण झालं नव्हतं. मात्र आता जगात जे जे काही गुन्हे आहेत. ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असं पाटील म्हणाले.
मंत्र्यांना प्रोटेक्शन
कॉन्स्टेबलला मारहाण असो, कुणाचा जावई ड्रग्ज कनेक्शमध्ये आहे, कुणाचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्याप्रकरणात आलंय, कुणाला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तर कुणाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुले होतात… ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रात असं सर्व सुरू आहे. कोणता ना कोणता गुन्हा मंत्र्याशी जोडला गेला आहे आणि या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंत्र्यांना प्रोटेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय नेतेच काहीही करतात तर आपण केलं तर काय बिघडलं अशी जनतेची मानसिकता होत आहे, असं ते म्हणाले.
हम करे सो कायदा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे राजकारण समाजकारणाचं माध्यम आहे. कायदे करण्याचं माध्यम आहे. पण इथे या, गुन्हे करा आणि राजकीय नेते असल्याने तुम्ही अशा प्रकरणातून बाहेर पडू शकता. तुमचं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही, असं सगळं सध्या राज्यात सुरू आहे. राज्यात हम करे सो कायदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
8 मार्च रोजी महिलांकडून निषेध
8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी भाजपच्या सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या काळी साडी किंवा काळा ड्रेस परिधान करून किंवा काळी फित लावून सरकारचा निषेध नोंदवणार आहे. राज्यात आम्ही असुरक्षित आहोत, हे सरकारला दाखवण्यासाठीच भाजपच्या महिला पदाधिकारी काळी फित लावून सरकारचा निषेध नोंदवणार आहे.
आंबेडकर जयंतीला दोन लाख मेणबत्त्या लावणार
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने राज्यात दोन लाख मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. राज्यातील 97 हजार बुथमध्ये त्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो लावून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (chandrakant patil slams maharashtra government over crime incidents in maharashtra)
संबंधित बातम्या:
मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया
मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?
(chandrakant patil slams maharashtra government over crime incidents in maharashtra)