पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी?; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांना टोला लगावला. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray)

पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी?; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
chandrakant patil
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 5:31 PM

मुंबई: काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असं म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांना टोला लगावला. पृथ्वीबाबांचं ते वक्तव्य स्तुतीपर होतं की…?, असा खोचक सवाल करतानाच असं विधान करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच केली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray over prithviraj chavan statement)

भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांनाच आव्हान दिलं. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपच्या मनात खोट नाही. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं पाटील म्हणाले.

शेलारांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनाही विचार करावा लागतो

आपल्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांना वर्षभर काही करता येणार नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही काळ अस्वस्थता होती, असं सांगतानाच आशिष शेलार बोलायला उभे राहिले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलताना विचार करावा लागतो. अशी तोफ आहे शेलार, असंही ते म्हणाले.

तो निर्णय घेणं सोपं नाही

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं असलं तरी आम्ही या जागांवर ओबीसी उमेदवारच उभे करणार आहोत. तसं आमचं ठरलं आहे. ओपनच्या जागेवर ओपनवाला टपून बसला असतो. ओबीसीला ती जागा सुटली म्हणून तो बोटं मोडत असतो, त्या ठिकाणी संधी आलीय ओबीसाला निवडणूक लढवण्याची. या ओबीसींच्या जागा आहेत आणि तिथे ओबीसीच उभा राहणार हा निर्णय करणं सोपं नाही. हा निर्णय किती महत्त्वाचा आहे, हे लोकांना जाऊन सांगा, असंही त्यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासाठी 12 आमदार निलंबित करून दिले, ओबीसी आरक्षण गेल्यावर ओपनला संधी असतानाही ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, हे सर्व लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

शिवसेनेत सत्तेत राहिल्यानेच केस उडाले

पाच वर्षे सरकारमध्ये आपण होतो. माझ्याकडे आठ आठ खाती होती. माझे केस उडाले ते त्यांच्याबरोबर सरकार चालवण्यामुळे झाले आहे. रोज भांडणं… रोज भांडणं… सकाळी उठलं की राऊत जाकीट बिकीट घालून रोज शिव्याशाप… अरे सरकारमध्ये आहात ना बाबा तुम्ही… रोज राजीनाम्याची धमकी… रोज बाहेर पडण्याची भाषा… एवढंच कळतं की बाहेर पडायचं… खोडा घालायचा… त्यामुळे आपल्याला आपल्या ताकदीवर सरकार आणायचं आहे.देवेंद्र फडणवीस सांगतील तसं आपण धावायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (chandrakant patil taunt cm uddhav thackeray over prithviraj chavan statement)

संबंधित बातम्या:

नेहमीची मर्सिडीज नाही, आदित्य ठाकरेंची रेंज रोव्हर दिमतीला, तुफान पावसात मुख्यमंत्री पंढरपूरच्या दिशेने

बेस्ट CM ला देव तरी कसा पावेल, आषाढी वारीवरुन भाजपची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

(chandrakant patil taunt cm uddhav thackeray over prithviraj chavan statement)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.