माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा : संजय राऊत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. (chandrakant patil will become nagaland governor, says sanjay raut)
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे. (chandrakant patil will become nagaland governor, says sanjay raut)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला. चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो.मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.
मोदी हे मोदी आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांनी मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही. मोदींचं कार्य, भूमिका आणि नेतृत्वाबद्दल कितीही विरोध असला तरी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. तसेच संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. देशातील जनतेच्या महागाईच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असं वाटतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
हा तर रडीचा डाव
सोनू सूद यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनू सूद लोकांना मदत करत होते. त्यावेळी खूप वाद झाला. तेव्हा भाजप आम्हाला सांगत होता हा एकटा माणूस कसा काम करत आहे. सरकार काही करत नाही. त्यावेळी सोनू सूदचा राज्यपालांनी सत्कारही केला होता. परंतु, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात भाग घेतला. तो केजरीवाल सरकारचा ब्रँड अम्बेसेडर झाला. म्हणून तो त्यांचा दुश्मन झाला. त्यानंतरच त्याच्यावर कारवाई सुरू झाली. सोनूच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. आयकरच्या धाडी हा तर रडीचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (chandrakant patil will become nagaland governor, says sanjay raut)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 September 2021 https://t.co/QOyEpQzxHd #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2021
संबंधित बातम्या:
महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर
(chandrakant patil will become nagaland governor, says sanjay raut)