संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ची प्रतिकृती : नवाब मलिक

संसदेत काल जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर 'गुजरात मॉडेल'ची प्रतिकृती : नवाब मलिक
nawab malik
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:15 PM

मुंबई : संसदेत काल जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. (Chaos in Rajya Sabha is replica of the Gujarat model Says Nawab Malik)

गुजरातमधील भाजप सरकार विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करते आणि आता भाजपच्या नेतृत्वाखालील हे केंद्र सरकार संसदेतही तेच करत आहे, असा प्रहारही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान #MurderOfDemocracy (‘लोकशाहीची हत्या’) हा हॅशटॅग वापरत नवाब मलिक यांनी ट्वीटवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करायला हवी होती : मलिक

संसदेत महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

केंद्राला उत्तरच द्यायचे नव्हते

संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगासस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला.

पवारांची नाराजी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नाही. राज्यसभेत महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. बाहेरच्या 40 हून अधिक पुरुष आणि महिलांना सभागृहात आणलं गेलं. हे वेदनादायी आहे. हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं पवार म्हणाले.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे, असं मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

इतर बातम्या

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

Explainer: SEBC आरक्षणामुळे आरक्षणाची सिस्टीमच बदलणार? OBC, एससी, एसटीचा कोटा कमी होणार का? वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, आता ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; विनायक मेटेंचं आवाहन

(Chaos in Rajya Sabha is replica of the Gujarat model Says Nawab Malik)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.