पोलीस भरतीत चिटिंग, मैदानी चाचणीत उमेदवाराकडून फसवणूक, संतापजनक प्रकार समोर

पोलीस भरती विषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. पोलीस भरती मैदानी चाचणीत उमेदवारांकडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस भरतीत चिटिंग, मैदानी चाचणीत उमेदवाराकडून फसवणूक, संतापजनक प्रकार समोर
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:49 PM

मुंबई : पोलीस भरती विषयी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. पोलीस भरती (Police Bharti) मैदानी चाचणीत उमेदवारांकडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मैदानी चाचणीसाठी आलेल्या 10 उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यंदाची ही भरती प्रक्रिया आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून पार पडत आहे. मात्र त्यात काही उमेदवार फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 3 मार्च आणि 4 मार्च अशा दोन दिवसांत तब्बल 10 उमेदवारांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मैदानी चाचणीतील धावणे या प्रकाराची चाचणी यंदा डिजीटल पद्धतीने तपासली जात आहे. त्यासाठी उमेदवाराच्या पायाला एक चिप बसवली जाते, जी धावण्याचा रेकॉर्ड ठेवते.

जास्त गुण मिळवण्याच्या हेतून उमेदवारांनी त्या चिप बदलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांकडून अशाप्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार हा पहिला नाही. याआधी काही वर्षांपूर्वी एका उमेदवाराने पोलीस भरती परीक्षेत उंची बसत नाही म्हणून कृत्रिमरित्या केस वाढवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील संबंधित प्रकरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता पोलीस भरतीत उमेदवारांनी धावण्याची चाचणी करणारी चीपच बदलल्याचा प्रकार समोर आलाय.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची त्यांची इच्छा असते. अनेकांना पोलिसांचा रुबाब आवडतो. पोलिसांची जबाबदारी आणि वर्दीबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळात आदर असतो. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल करतात. यापैकी अनेकांचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. तर काही तरुण पुन्हा नव्या जोमाने पोलीस भरतीच्या तयारीला लागतात. पोलीस होणं सोपं नाही, पण अशक्यही नाही, असा त्यांचा विचार असतो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.