सरकारसोबत ओबीसींच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक

एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक होत असताना दुसरीकडे ओबीसी नेते देखील आता आक्रमक झाले आहेत. आज सरकारसोबत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

सरकारसोबत ओबीसींच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 1:13 AM

ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावरुन शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ आक्रमक झाले. सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारनं काय केलं. खोट्या नोंदींवरुन कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप, भुजबळांना केलाय. तर हाके आणि जरांगेंमध्येही शाब्दिक चकमक उडाली आहे. ओबीसींच्या आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंच्या मागणीसंदर्भात ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. सरकार सोबतच्या बैठकीत शिष्टमंडळाकडून आलेले मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले.

सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा. 8 लाखांहून अधिक हरकती आल्या,त्यापुढं काय झालं. जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत, त्यावर कारवाई करा. खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा,दिशाभूल केली जातेय. सगेसोयरेंच्या व्याख्येवर सरकाराला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही,मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको. सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील,त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत. लक्ष्मण हाकेंची मागणी योग्य, सरकारनं विचार करावा असं भुजबळांनी म्हटलंय.

पंकजा मुंडेंनी म्हटलंय की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये त्याची स्पष्टता सरकारनं करावी. दबावाखाली दाखले दाखले असल्यास चौकशी करा. तर मुंबईतल्या बैठकीवरुन जरांगेंनी मात्र सर्व ओबीसी नेत्यांनाच बजावलं. मराठा समाज आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असं इशाराच जरांगेंनी दिला.

प्राध्यापक लक्ष्मण हाके 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेत, 9 व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या जालन्याच्या वडीग्रोदी गावात उपोषणस्थळी आले. आणि मुख्यमंत्र्यांशी फोनलवरुन चर्चा झाल्यानंतर मुंबईत तात्काळ बैठक ठरली.

मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्य आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे लिखीत द्या, अशी मागणी हाकेंची आहे. तसंच जस्टिस शिंदे कमिटीची स्थापना झाल्यानंतर, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या खाडाखोड केलेल्या आहेत, असा आरोप हाकेंचा आहे..

जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना. राजकीय करिअरमधून उठवतो, असा इशाराही दिला. भुजबळांची कारकीर्द उद्धवस्त करणारा तू कोण ? असा सवाल भुजबळांनी केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.