ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावरुन शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ आक्रमक झाले. सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारनं काय केलं. खोट्या नोंदींवरुन कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप, भुजबळांना केलाय. तर हाके आणि जरांगेंमध्येही शाब्दिक चकमक उडाली आहे. ओबीसींच्या आरक्षणावरुन लक्ष्मण हाकेंच्या मागणीसंदर्भात ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. सरकार सोबतच्या बैठकीत शिष्टमंडळाकडून आलेले मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले.
सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा. 8 लाखांहून अधिक हरकती आल्या,त्यापुढं काय झालं. जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत, त्यावर कारवाई करा. खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा,दिशाभूल केली जातेय.
सगेसोयरेंच्या व्याख्येवर सरकाराला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही,मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको.
सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील,त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत. लक्ष्मण हाकेंची मागणी योग्य, सरकारनं विचार करावा असं भुजबळांनी म्हटलंय.
पंकजा मुंडेंनी म्हटलंय की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये त्याची स्पष्टता सरकारनं करावी. दबावाखाली दाखले दाखले असल्यास चौकशी करा. तर मुंबईतल्या बैठकीवरुन जरांगेंनी मात्र सर्व ओबीसी नेत्यांनाच बजावलं. मराठा समाज आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असं इशाराच जरांगेंनी दिला.
प्राध्यापक लक्ष्मण हाके 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेत, 9 व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या जालन्याच्या वडीग्रोदी गावात उपोषणस्थळी आले. आणि मुख्यमंत्र्यांशी फोनलवरुन चर्चा झाल्यानंतर मुंबईत तात्काळ बैठक ठरली.
मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्य आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे लिखीत द्या, अशी मागणी हाकेंची आहे. तसंच जस्टिस शिंदे कमिटीची स्थापना झाल्यानंतर, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या खाडाखोड केलेल्या आहेत, असा आरोप हाकेंचा आहे..
जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना. राजकीय करिअरमधून उठवतो, असा इशाराही दिला. भुजबळांची कारकीर्द उद्धवस्त करणारा तू कोण ? असा सवाल भुजबळांनी केला आहे.