जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा… छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला

सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतलं हा मराठा समाजाला मोठा दिलासा आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची आधीपासूनची भूमिका आहे. क्युरेटिव्ह पीटिशनमुळे स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मागच्यावेळी ज्या त्रुटी आढळल्या. तो अडथळा आता कोर्ट दूर करू शकतो. असं झालं तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळेल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय.

जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा... छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 6:38 PM

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : येवल्याच्या येडपटाला आता शांत बस. काही वेडवाकडं बोलू नको. झोपून राहा. माझ्या नादाला लागू नको. नाही तर कचकाच दाखवेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पाटील यांच्या या इशाऱ्यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अशा कोल्हेकुईला भीक घालत नाही. त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतोय, असं सांगतानाच त्यांच्या भाषणातच विसंगती होती. जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला. तुला बघतो… तुला बघतो असं ते सारखं बोलत होते. छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढला आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढत आहे, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे.

आरे केलं तर कारे होईलच

कधी म्हणतात येवल्याचा येडपट आहे. मी जर म्हटलं… (हातवारे करत इशारा) ते बोलायचं नाही असं ठरलं आहे. जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला. जास्त घेतल्याचा हा परिणाम आहे. आता ते 20 जानेवारीपर्यंत शांत बसणार आहेत. ते हॉस्पिटलमध्ये राहतात. ते एक तर हॉस्पिटलमध्ये तरी राहतात किंवा बाहेर तरी. त्यांची 12 इंचीची छाती आहे. छाती जास्त ठोकू नका. छातीत गडबड होईल. तब्येत सांभाळा. अरे म्हटलं तर कारे होईलच. सारखं सारखं बोलत राहिला तर मला बोलावं लागेल, असं भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal

chhagan bhujbal

भुजबळांवर टीका नाही केली तर काय बोलणार?

त्यांचं अर्ध भाषण फक्त भुजबळ यांच्यावरच होतं. नंतरच भाषण लेकरं वगैरे वगैरेवर होतं. भुजबळांवर बोललं नाही, टीका केली नाही तर भाषणात बोलणार काय? मी कालच म्हटलं व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी आज घेतला नाही. काय झालं माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलतात.

हॉटेल भुजबळ किंवा त्यांच्या माणसांनी जाळलं, असं सुरुवातीला म्हणाले. म्हणे मराठ्यांना डाग लावला. आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरं आणि हॉटेल जाळलं. आता भुजबळांचं नाव घेत आहेत. थोड्यावेळाने म्हणतात, मराठ्याच्या वाट्याला जाऊ नका. बीडला काय होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे बीडला जे झालं ते तुम्हीच केलं हे सिद्ध होतं ना? तुम्हीच कबूल केलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं आलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, त्यांच्या भाषणात विसंगीत येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी लगावला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.