तर आम्ही मनोज जरांगे पाटील यांचे उपकार मानू; छगन भुजबळ असं का म्हणाले?

माझ्याकडे मेसेज आला होता. एका नाभिक बांधवाने ओबीसीच्या बाजूने पोस्ट केली म्हणून त्या गावातील मराठा समाजाच्या लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायचा निर्णय घेतला. मग उद्या त्या सर्व नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला तर तुम्ही काय करणार? एकमेकांचे केस कापणार का? त्या गावापुरता हा विषय होता. मी नाभिक समाजाची बाजू घेतली. अशा प्रकारे कुणी कुणावर बहिष्कार टाकू नये असं माझं मत होतं. मी जे म्हणतोय तेच नाभिक समाज म्हणत आहे. अर्धवट माहिती कोणी देत असेल तर त्याच्या आहारी जाऊ नये.

तर आम्ही मनोज जरांगे पाटील यांचे उपकार मानू; छगन भुजबळ असं का म्हणाले?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 3:59 PM

अक्षय कुडकेलवार, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. भुजबळांनी राजीनामा दिला तर दिला. आम्हाला काय त्याच्याशी? आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. भुजबळांनी आधी तलाठी व्हावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. जरांगे यांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आधी तू नीट उभा राहा. मला निवडणुकीचं सांगू नकोस. तू साधी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखव, असं आव्हानच छगन भुजबळ यांनी जरांगे यांना दिलं आहे. तसेच ओबीसीतून आरक्षण घेण्याचं जरांगे यांनी बंद करावं. आम्ही त्यांचे उपकार मानू, असं मोठं विधानही भुजबळ यांनी केलं.

छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी हे विधान केलं. मनोज जरांगे आमच्यात फूट पाडत आहे. कधी म्हणतो धनगरांची बाजूने लढणार आहे, कधी म्हणतो नाभिक समाजाच्या बाजूने लढणार आहे. अरे तू तर आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहेस. ते थांबव आधी. खूप उपकार होतील आमच्या सर्वांवर. ओबीसीतूनच तुझं आरक्षण घेण्याचं काम चाललंय. ते तू आधी मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल, असं छगन भुजबळ म्हणाले.

तू आधी नीट उभा राहा

जरांगेंना सांगा तू आधी ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ ग्रामपंचायत नाही, मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला. दोन वेळा आमदारही झाला. त्यानंतर येवल्याला चारवेळा आमदार झाला. तू मला सांगण्याची गरज नाही. तू आधी नीट उभा राहा, असं भुजबळ म्हणाले.

तेली, माळींना ओबीसीतून काढण्यासाठी याचिका

कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून आरक्षण कसं वाचवायचं हा आमचा प्रयत्न आहे. बाळासाहेब सराटे यांनी केस टाकली आहे. तेली, माळी, कुणबी यांना ओबीसी आरक्षणाच्या बाहेर काढण्याची त्याांची मागणी आहे. उद्या बाळासाहेब सराटे यांची केस आहे. आज आमची केस होती. बॅकडोअरने काही लोकांना ओबीसी आरक्षणात घेतलं जात आहे, त्याबाबतची ही केस होती. ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत आहे, त्यासाठी आमची केस होती. त्यावर येत्या 20 तारखेला सुनावणी होणार आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

लोकशाही आहे, कुणाला काय करायचे…

आम्ही ज्या रॅली घेतो, त्यात सर्व पक्षाचे लोक असतात. भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाचे लोक असतात. सर्व पक्षातील ओबीसींचे लोक आमच्यासोबत आहेत. आरक्षण वाचवण्यासाठी सोबत येत आहेत. अशावेळी आम्ही नवीन पक्षाचा विचार केला तर ही मंडळी काय करणार? त्यामुळे कदाचित आमच्यात दोन मतप्रवाह असू शकतात. होऊ शकतात. आज जे ओबीसी एकत्र येत आहेत. त्यात खंड पडायला नको. त्याचा विचार व्हावा.

आज आमचा संपूर्ण फोकस सर्व पक्षांचं सहकार्य घेऊन, सरकारमधील पक्षाचे जे ओबीसी असतील त्या सर्वांचं सहकार्य घेऊन ओबीसींवरील आक्रमण थांबवणं हा आहे. त्यामुळे त्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्या विषयावर फोकस ठेवला पाहिजे. ही माझी भावना आहे. बाकी लोकशाही आहे, कुणाला काय करायचं आहे ते करू शकतात. पण आज जास्तीज जास्त ताकद… सर्व पक्षाचे आमदार आणि नेत्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभी करणं गरजेची आहे. आमच्यासोबत आमदार, नेते येत आहेत. त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे, असं भुजबळ म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.