पत्रकार म्हणाले, भाजपा तुमच्या निर्णयावर टीका करते, भुजबळांनी भाजपा नेत्यांचं कामच सांगितलं

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. (chhagan bhujbal)

पत्रकार म्हणाले, भाजपा तुमच्या निर्णयावर टीका करते, भुजबळांनी भाजपा नेत्यांचं कामच सांगितलं
छगन भुजबळ, मंत्री.
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 7:00 PM

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप तुमच्या निर्णयावर टीका करते, असा सवाल पत्रकारांनी भुजबळांना केला. त्यावर भुजबळांनी भाजप नेत्यांच्या कामाची पोलखोल केली. प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवणं हेच भाजप नेत्यांचं काम आहे. त्यांना दुसरं काम काय आहे?, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. (chhagan bhujbal taunt bjp leader over obc reservation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला. छगन भुजबळ यांनी याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना एका पत्रकाराने प्रश्न केला. दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवादी पकडल्यानंतर भाजपने महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना टार्गेट करण्यास सुरुवात केलं आहे. त्यावर तुमचं मत काय? असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर भुजबळांनी आपल्या खास शैलीत त्याला उत्तर दिलं. भाजपचं कामच ते आहे. प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवणं हे त्यांचं कामच आहे. प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करणं हेच त्यांचं काम आहे. दुसरं काम काय त्यांना? इतर राज्यात त्यांचं सरकार आहे तिथे काय होत आहे. तिथे पाहा म्हणावं, असा चिमटा भुजबळांनी काढला.

प्रत्येक गोष्टीत भाजपचं राजकारण

साकीनाका येथे झालेल्या बलात्कार प्रकरणावरूनही विरोधक सरकारवर टीका करत असल्याचं भुजबळांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीत भाजपला राजकारण दिसत असतं. अशा घटना या दुर्देवी आहेत. त्या सर्वत्र होतात. त्यावर सर्वांनीच नियंत्रण ठेवलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

ईडी किंवा मंत्रिपद

यावेळी ईडीच्या कारवायांवरूनही त्यांनी भाजपला टोले लगावले. भाजपमध्ये नसाल तर ईडीच्या आत जा. ईडीच्या कारवाया होऊ द्यायच्या नसेल तर काही लोकांनी मार्ग दाखवला आहेच. ते मंत्रीही झाले आहेत. सर्वांना माहीत आहे. त्याबद्दल काय सांगायचं, असा चिमटा त्यांनी काढला.

पालिकेतही हाच अध्यादेश

जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीसाठीच हा अध्यादेश लागू राहणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर महापालिकेतही हाच अध्यादेश लागू करणार असल्याचं ते म्हणाले. कोर्टाच्या निर्णयामुळे आरक्षणाबाबत ओबीसींची 100 टक्के अडचण निर्माण होणार होती. अध्यादेशामुळे ती 10 टक्क्यावर आली आहे. उरलेल्या 10 टक्क्यासाठी आम्ही लढणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

कुठे किती आरक्षण मिळणार?

पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या 8 जिल्ह्यांमधील आरक्षण जिल्हा व प्रवर्गनिहाय पुढील प्रमाणे असेल:

पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या 4 जिल्ह्यांमध्ये अनु.जाती 10 टक्के,अनु.जमाती 22 टक्के,विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 15 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के,

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के,अनु.जमाती 14 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 34 टक्के,

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनु.जाती 13 टक्के,अनु.जमाती 15 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के, भज-क 3.5 टक्के,भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 30 टक्के,

गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के, अनु.जमाती 24 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के,भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 17 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 24 टक्के,

रायगड जिल्ह्यामध्ये अनु.जाती 12 टक्के,अनु.जमाती 9 टक्के, विजा-अ 3 टक्के, भज-ब 2.5 टक्के,भज-क 3.5 टक्के, भज-ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, इमाव 19 टक्के, ईडब्ल्यूएस 10 टक्के आणि खुला 37 टक्के. (chhagan bhujbal taunt bjp leader over obc reservation)

संबंधित बातम्या:

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

OBC Reservation: सरकारच्या अध्यादेशानं नेमकं किती टक्के आरक्षण ओबीसींना मिळणार? भुजबळांनी टक्केवारीच सांगितली

Maharashtra cabinet meeting decision | चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त, कोकणला 3 हजार कोटी, ठाकरे कॅबिनेटचा मोठा निर्णय

(chhagan bhujbal taunt bjp leader over obc reservation)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.