OBC Reservation : आता आंदोलने उभी राहतील, त्यात आम्ही सहभागी होऊ; छगन भुजबळांचा इशारा

ओबीसीं(OBC Reservation)चा डेटा नव्हता, मग देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)नी कोणता डेटा त्यावेळी केंद्राकडे मागितला, असा सवाल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विचारला आहे.

OBC Reservation : आता आंदोलने उभी राहतील, त्यात आम्ही सहभागी होऊ; छगन भुजबळांचा इशारा
छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 3:24 PM

मुंबई : केंद्राकडे ओबीसीं(OBC Reservation)चा डेटा नव्हता, मग देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)नी कोणता डेटा त्यावेळी केंद्राकडे मागितला? त्यावेळा ते म्हणाले नाहीत, की डेटा नाही, किंवा सदोष आहे. केंद्र सरकार त्यावेळेला काहीही बोलले नाही. मात्र आता केंद्र सरकार एकच म्हणत आहे, आता आमच्याकडे डेटा नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

‘मध्य प्रदेशातही ट्रिपल टेस्ट’

देशातले ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. मध्य प्रदेश(Madhya Pradesh)मध्येही ट्रिपल टेस्ट लागू केले आहे. कोरोनाच्या परिस्थिती हे कसे शक्य होईल, याचा मंत्रिमंडळात विचार करू, असे ते म्हणाले. भाजपा जर राज्य सरकारला यात दोषी धरत असेल तर मध्य प्रदेशच्या बाबतीत त्यांचे काय मत आहे, असा सवालही त्यांनी केलाय.

‘कामाला लागू’

येत्या तीन महिन्यात विविध खाती, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावून डेटा जमा करू, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. आताच्या १७ जानेवारीला पुन्हा ही सुनावणी होणार आहे. ही निवडणूक जनरलमध्ये होईल. आता आयोगाने काम जलदगतीने पार पाडले तर पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सहकार्य करावे’

प्रशासनातील सर्व सचिवांनी आयोगाला सहकार्य करावे, एवढेच आपल्या हातात आहे. सरकारही सहकार्य करेल. पत्रापत्री न करता त्यांना काय हवे आहे, यासंबंधी यंत्रणा कामाला लावणे यावर लक्ष देणार असे ते म्हणाले. सचिवांनी इतर कामे बाजुला सारून यावरच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोप करून फक्त वेळ जाणार आहे. त्यामुळे प्राधान्य पुढच्या तीन महिन्यात आकडेवारी गोळा करण्यावर असेल, असे ते म्हणाले.

SC on OBC Reservation | राज्य सरकार म्हणाले 6 महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकला; कोर्ट म्हणाले, आम्ही पाहू!

SC on OBC Reservation | ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम, राज्य सरकारला झटका, याचिका फेटाळली, केंद्राला आदेश द्यायलाही कोर्टाचा नकार

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.