“शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री, उद्या सवाल करणार”; ठाकरे गटाच्या नेत्यानं कळीचा मुद्दा उपस्थित केला

हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी धोक्याचे नाही तर साऱ्या देशासाठी धोक्याचे असल्याचे सांगत या गद्दारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री, उद्या सवाल करणार; ठाकरे गटाच्या नेत्यानं कळीचा मुद्दा उपस्थित केला
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 10:09 PM

मुंबईः ठाकरे गटाचे तरुण आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळीत घेतलेल्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काही दिवसापूर्वी दिलेल्या चँलेंजची आठवण करून देत मी आमदारकीच राजीनामा देतो तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. त्यानंतर आपण वरळीतून लढण्याचे चँलेंज दिले होते. त्याचे काय झाले असा सवाल करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणि त्यांच्या गटातील आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली.

आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना हे खोकेवाल्यांचे सरकार असल्याचे म्हणत आज पुन्हा एकदा त्यांनी गद्दार म्हणत एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर टीका केली.

हे गद्दार सरकार फक्त महाराष्ट्रासाठी धोक्याचे नाही तर साऱ्या देशासाठी धोक्याचे असल्याचे सांगत या गद्दारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यावर गद्दार आणि खोक्यांचे सरकार अशी टीका केली तर ती त्यांनी नाकारत नाही असा टोलाही त्यानी शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता सगळीकडे घोटाळा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील रस्ता घोटाळ्यातही कोट्यवधींचे घोटाळे केले जात आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा टेंडर त्यांना काढावी लागत आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळीतून घेतलेल्या सभेमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे आजच्या गर्दीला उद्देश्यून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावताना म्हणाले की, आमच्या मेळाव्याला खुर्च्यांची नाही तर कार्यकर्त्यांची गर्दी असते असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

निर्धार मेळाव्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील आमदारांना तुम्ही शिवसेना का सोडली या प्रश्नावर ते वेगवेगळी उत्तर देत असतात.

कधी हिंदुत्वासाठी तर कधी मुख्यमंत्री भेटत नव्हते असं सांगत आदित्य ठाकरे ब्लू शर्ट घालतात म्हणून आम्ही शिवसेना सोडली असल्याचे सांगतात अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यात सत्तांतर घडवून आणले मात्र शिंदे-फडणवीस सरकार राज्यात येताच. राज्यात येणारे उद्योग हे गुजरातला गेले असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.