मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थानात बोलबाला; राजस्थानच्या आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

ShivSena Eknath Shinde | राजस्थानमधील भरतपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थानात बोलबाला; राजस्थानच्या आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 3:21 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राज्यभरातून इनकमिंग सुरु आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात देशभराही चर्चा होत आहे. आता राजस्थानमधील भरतपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष आमदार डॉ. ऋतू बनावत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. आमदार डॉ. ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेशाने राजस्थानमध्ये शिवसेनेचे खाते उघडले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले…

ऋतू बनावत यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज खूप आनंदाचा दिवस आहे. ऋतू बनावत यांचे शिवसेनेत मी स्वागत करतो. अपक्ष लढून त्यांनी चांगल्या मतांनी विजय मिळवला. त्यांनी आतापर्यंत अनेक चांगली कामे केली आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे. मी पण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करता करता राज्याचा मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. आता माझ्यासोबत 50 आमदार, 13 खासदार आणि लाखो कार्यकर्ता आहेत. देशातील 23 राज्याचे शिवसैनिकांनी मला पाठिंबा दिला. मी जेव्हा उठाव केला, तेव्हा ही सर्व सोबत होती. सर्व ठिकाणी शिवसेना काम करत आहे. शिवाजी जी महाराज आणि महाराणा प्रताप दोघे महान आहे. मी पाच रुग्णवाहिका तुमच्या परिसरासाठी देत आहे.

हे सुद्धा वाचा

ऋतू बनावत म्हणतात, यामुळे शिवसेनेत प्रवेश

माझा आणि शिवसेनेच्या विचार एक आहे. म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी एक सामान्य घराची महिला आहे. लोकांनी मला निवडून दिले. आता मी राजस्थानमध्ये शिवसेनेला मोठ्या करण्यासाठी काम करेल. मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेत संधी दिली, मी त्यांचा आभार मानते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.