“निवडणुका आल्या की, मुंबई तोडणार अशी ओरड”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उडवून लावलं
निवडणुका जवळ आल्या की, विरोधकांकडून कायम मुंबई तोडणार अशी ओरड सुरू होते. मात्र ही मुंबई मराठी माणसांची आहे, आणि ती महाराष्ट्राची आहे असंही थेटपणे विरोधकांना सांगण्यात आला आहे.
मुंबईः हिवाळी अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सध्या त्यांच्याकडे टीका करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्यामुळेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका करताना ते चहापानाच्या खर्चावर घसरले असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
निवडणुका जवळ आल्या की, विरोधकांकडून कायम मुंबई तोडणार अशी ओरड सुरू होते. मात्र ही मुंबई मराठी माणसांची आहे, आणि ती महाराष्ट्राची आहे असंही थेटपणे विरोधकांना सांगण्यात आला आहे.
गेल्या दोन अडिच वर्षे वर्षा बंद होते, मात्र आता वर्षावर लोकं येत असल्यामुळे त्यांना चहा तर द्यावा लागणारच असा टोला लगावत विरोधकांकडून आता चहापानाच्या खर्चावरही टीका केली जात आहे अशी टीका त्यांनी केली.
पुण्यातील कसाब पोटनिवडणुकीवरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणूका आहे म्हणजे जावे तर लागणारच.
त्यातच आम्हाला लोकांचे प्रेम मिळत असल्यामुळेच अजित पवार यांची पोटदुखी होत आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर सातत्याने येत आहेत.
त्यावरून विरोधकांकडून टीका केली जाते. मात्र विरोधकांना केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी किती निधी उपलब्ध झाला. त्यातून नवनवीन योजना कोणत्या आल्या ते दिसत नाही अशा शब्दात विरोधकांवर त्यांनी पलटवार केला आहे.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांना जाब का विचारला जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर विरोधकांकडून राहुल गांधी यांना का जाब विचारला जात नाही असा सवाल त्यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे.