लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गैरप्रकार कराल तर सावधान
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. जे दलाल किेंवा एजंट यामध्ये चुकीचं काही करताना सापडले तर त्यांना सरळ तुरुंगात टाकलं जाईल. याबाबत कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. अधिकाऱ्यांनाही माझ्या सुचना आहेत. त्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरप्रकार करणाऱ्या दलालांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.मी साताऱ्याचे कलेक्टर यांच्याशी बोललो. माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणींसाठी ही योजना आहे. यामध्ये कोणीही दलाल, एजेंट कुठे मस्ती करतील आणि भ्रष्टाचार करतील तर त्यांना कुठलाही थारा नाही. यांना सरळ जेलमध्ये टाकणार. माझा हा इशारा समजून घ्यावा. अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातील बहिणींच्या नावावर कोणी पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही.
एसटी संपाबाबत चर्चा सुरु आहे. मागे एक बैठक झाली आहे. उद्याही बैठक आहे. गणपती आहेत लोकांचा सण आहे त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे लोकांना वेठीस धरु नये. तुमच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. सरकार तुमच्यासोबत आहे. ते सरकारचा एक भाग आहेत. कुणीही संपावर जाऊ नये असं आवाहन करतोय.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. ते आमच्या हृदयात आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करतो. या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी आहे. कोणी कोणी जोडो मारे आंदोलन केले. मोठे नेते रस्त्यावर येऊन जोडे मारत होते हे दुर्दैवी आहे.