Chintamani | लालबाग पाठोपाठ चिंतामणीचीही मूर्ती नाही, मंडळाच्या देव्हाऱ्यात चांदीच्या मूर्तीची पूजा

दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीच्या मूर्तीची पूजा करुन गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यात येणार आहे. 

Chintamani | लालबाग पाठोपाठ चिंतामणीचीही मूर्ती नाही, मंडळाच्या देव्हाऱ्यात चांदीच्या मूर्तीची पूजा
Follow us
| Updated on: Jul 03, 2020 | 9:14 PM

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा मूर्तीची स्थापना करण्याऐवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना यंदा मंडळाच्या देव्हार्‍यातील पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीने करण्यात येणार आहे. (Chinchpokli Sarvjanik Utsav Mandal Decides To Cancel Ganeshotsav)

यावर्षी दरवर्षीप्रमाणे मूर्ती घडवण्यात येणार नाही. चांदीच्या मूर्तीची पूजा करुन गणेशोत्सवाची परंपरा अखंडित राखण्यात येणार आहे, असा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मंडळाने हे वर्ष जनआरोग्य वर्ष म्हणून जाहीर केलं. गणेशोत्सव काळात रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा, रुग्णसाहित्य केंद्र, शासकीय रुग्णालयास वैद्यकीय उपकरण आणि 101 कोव्हिड योद्धयांचा सन्मान, असे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव गणेशमूर्ती विनाच, ‘लालबागचा राजा’ मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याऐवजी 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे.

मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द

‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला होता. मूर्ती लहान आणून उत्सवाची उंची वाढवण्याचे मंडळाने ठरवले होते. तर ‘परळचा राजा गणेश मंडळा’नेही 23 फुटांऐवजी 3 फुटांची गणेशमूर्ती बसवण्याचे ठरवले आहे.

Chinchpokli Sarvjanik Utsav Mandal Decides To Cancel Ganeshotsav

संबंधित बातम्या :

Mumbaicha Raja | ‘मुंबईच्या राजा’ची 22 फुटांची मूर्ती रद्द, ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चा निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.