संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत अहवालाला काडीची किंमत नाही; चित्रा वाघ भडकल्या

| Updated on: Feb 19, 2021 | 4:04 PM

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य सरकारला अहवाल दिल्याचं कळतंय. (chitra wagh objection on police report of pooja chavan suicide case)

संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत अहवालाला काडीची किंमत नाही; चित्रा वाघ भडकल्या
चित्रा वाघ, भाजप नेत्या
Follow us on

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य सरकारला अहवाल दिल्याचं कळतंय. वन मंत्री संजय राठोड यांची चौकशी न करता हा अहवाल केलाच कसा? असा सवाल करतानाच जोपर्यंत संजय राठोड यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नाही, असं भाजप नेत्या चित्र वाघ यांनी सांगितलं. (chitra wagh objection on police report of pooja chavan suicide case)

चित्रा वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण प्रकरणाच्या अहवालावरून राज्य सरकारवर टिकास्त्र सोडलं. संजय राठोड यांची चौकशी न करता अहवाल सादर झालाच कसा? राठोड यांची चौकशी न करता अहवाल तयार करण्यात आलाच कसा? असा सवाल वाघ यांनी केला. पूजा चव्हाण प्रकरणात 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात राठोड यांचं अरुण राठोड आणि विलास नावाच्या तरुणांसोबत संभाषण आहे. त्यात पूजाला आत्महत्येला परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल घे… इथपर्यंतचं संभाषण आहे. त्याची चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे राठोडांच्या चौकशीशिवाय हा अहवाल बनूच शकत नाही. कारण मुख्य आरोपची चौकशी नाही. किंबहुना ते बेपत्ता आहेत, असं त्या म्हणाल्या.

तुम्ही मखलाशी कशाला करता?

काही नेते संजय राठोड आमच्या संपर्कात आहेत असं सांगत आहेत. पण तुमच्या संपर्कात राहून काय करणार? राठोड जर मंत्र्यांच्या संपर्कात आहेत तर पोलिसांनी त्यांच्याकडून पत्ता घेऊन त्यांची चौकशी करावी. जनतेच्या संपर्कात त्यांनी यायला हवे. ते अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. कुठे आहेत कुणालाच माहीत नाही. हे नेतेच त्यांना संपर्क करणार, तेच त्यांची चौकशी करणार आणि अहवालही तेच देणार असं कसं चालेल. प्रत्येक नेता राठोड निर्दोष असल्याचं सांगत आहे. ते निर्दोष असतील तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. तुम्ही कशाला मखलाशी करता? असा सवालही त्यांनी केला.

ऑडिओ क्लिपची चौकशी करा

पूजा चव्हाण प्रकरणात 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्याची शहानिशा कोण करणार? या क्लिपची चौकशी न करताच अहवाल दिला कसा? असे सवाल करतानाच जोपर्यंत या प्रकरणात संजय राठोड यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नाही, असं त्या म्हणाल्या. (chitra wagh objection on police report of pooja chavan suicide case)

 

संबंधित बातम्या:

… तर संजय राठोडांचीही चौकशी करणार; पुणे पोलिसांचं मोठं विधान

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पुणे पोलिसांचे पथक यवतमाळमध्ये दाखल, रुग्णालयातील उपचाराबाबत तपास होणार

(chitra wagh objection on police report of pooja chavan suicide case)