मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा मुलं म्हणून हिणवणार नाही; चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार

राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लाचखोराची बायको म्हणून डिवचले होते. त्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. (Chitra Wagh)

मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा मुलं म्हणून हिणवणार नाही; चित्रा वाघांचा मेहबूब शेख यांच्यावर पलटवार
Chitra-Wagh
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 11:10 AM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना लाचखोराची बायको म्हणून डिवचले होते. त्यामुळे चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी शेख यांच्यावर पलटवार केला असून मी कुणालाही बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याचं मुलं म्हणून हिणवणार नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. (Chitra Wagh slams again ncp leader Mahebub Shaikh)

चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा पलटवार केला आहे. मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जात आहे. तरी ही मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही, असा हल्लाबोल वाघ यांनी केला आहे.

आवाज उठवत राहणारच

विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं… या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा, असं आवाहन करतानाच मी तुमच्यासोबत आहे. मी आवाज उठवत आहे आणि उठवत रहाणारचं, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

वाघ-शेख यांच्यातला वाद नेमका काय?

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं.

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत. एकंदरित या दोघांमध्ये येत्या काळात जोरदार संघर्षाची शक्यता आहे.

सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॉगबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलंय… कुणाला विचारायची आवश्यकता नाही…., अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं.

जस आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा… कर नाही त्याला डर कश्याला ओ…. आणि भुंकतंय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं प्रतिआव्हान मेहबूब यांनी चित्रा वाघांना दिलं होतं.

मी वाघ आहे… कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही

“वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी मेहबूब यांचा वार परतावून लावला आहे. मेहबूब यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. (Chitra Wagh slams again ncp leader Mahebub Shaikh)

संबंधित बातम्या:

वाघ पैसे घेतो आणि वाघिनीला नेऊन देतो, असेल हिम्मत तर नवऱ्याची नार्को टेस्ट करा, राष्ट्रवादीच्या नेत्याचं चित्रा वाघ यांना आव्हान

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; सुविधा कशी मिळणार?

(Chitra Wagh slams again ncp leader Mahebub Shaikh)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.