मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा… राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून आवाहन; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया काय?

चित्रा वाघ भाजपचा अजेंडा चालवत आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे म्हणून असे विधान जाणून-बुजून केलं जातं आहे. शरद पवार यांच्यावर बोलणं चुकीचं आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.

मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून आवाहन; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया काय?
chitra waghImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:54 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसब्यातील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यातून काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने चक्क मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सौदी, कुवेत आणि दुबईला गेलेल्या मुस्लिमांनाही मतदानासाठी पुण्यात बोलावून घ्या, असं आवाहनही केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा अल्पसंख्याक मेळावा प्रचंड वादग्रस्त ठरला आहे. या मेळाव्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर चित्रा वाघ यांनी हा तर जिहादच असल्याचं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

कसब्यातील राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक वेळाव्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी हे विधान केलं होतं. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केलं जातय आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात. मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणतात… इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती…हा तर एकप्रकारे जिहादच..!, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

आयोगाने दखल घ्यावी

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही राष्ट्रवादीच्या या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्यासाठी दुबईवरुन लोकं आणा, सौदीवरून लोकं आणा. मेलेले आहेत त्यांना हजर करा, ही विधान आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या अल्पसंख्याक बैठकीतील. काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांचे. बोगस मतदान घडविण्याची योजना पण आखली जात आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ अजेंडा चालवत आहेत

दरम्यान, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हिरोली यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. उस्मान हिरोली काहीही चुकीचे बोलले नाहीत. चित्रा वाघ मुद्दाम याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात कसबा मतदारसंघातील 1600 मतदार हे दुबई आणि कुवेतमध्ये राहतात.

त्यांना बोलवण्याचा हिरोली यांचा प्रयत्न होता. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे विधान बिलकुल केलं नाही. चित्रा वाघ भाजपचा अजेंडा चालवत आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे म्हणून असे विधान जाणून-बुजून केलं जातं आहे. शरद पवार यांच्यावर बोलणं चुकीचं आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.