राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाकडे किती आमदार?, काय आहेत दावे-प्रतिदावे, हे आमदार संभ्रमावस्थेत

हुसंख्ये आमदार आमच्याबरोबर आहेत. म्हणून अजित पवार येथे येऊन बसला, असं अजित पवार यांनी कडक शब्दात सांगितलं. त्याला प्रफुल्ल पटेल यांनी दुजोरा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाकडे किती आमदार?, काय आहेत दावे-प्रतिदावे, हे आमदार संभ्रमावस्थेत
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 6:56 PM

मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांवरून आता दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये संभ्रमावस्था आहे, असं जयंत पाटील म्हणाले. आम्हाला अनेक आमदारांचे फोन आले. असाही दावा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील म्हणाले, बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत. आम्हाला बऱ्याच आमदारांना फोन आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील तरुणाई फोडाफोडीच्या राजकारण्यांएवजी शरद पवार यांच्यासोबत उभी राहील.

प्रफुल्ल पटेल म्हणाले…

तर, बहुसंख्य आमदार आमच्यासोबत आहेत, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं. प्रफुल्ल पटेल म्हणाले, आमच्याकडे काल किती आमदार होते ते तुम्ही पाहिले. त्यांनी सांगावं. त्यांच्याकडे किती आमदार आहेत. बहुसंख्ये आमदार आमच्याबरोबर आहेत. म्हणून अजित पवार येथे येऊन बसला, असं अजित पवार यांनी कडक शब्दात सांगितलं. त्याला प्रफुल्ल पटेल यांनी दुजोरा दिला.

हे आमदार आहेत संभ्रमावस्थेत

पारनेरचे आमदार नीलेश लंके म्हणाले की, आम्ही पवार कुटुंबीयांसोबत आहोत. मात्र, कोणते पवार हे त्यांनी सांगितलं नाही. शिरूरचे आमदार अशोक पवार हे दुपारपर्यंत नॉट रिचेबल होते. नंतर त्यांनी फोन घेतला नाही. अकोल्याचे आमदार किरण लहामटे ५ जुलैला होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेईन. पण, कोणत्या पवरांच्या बैठकीला जातील, हे ते बोलले नाहीत.

पुसदचे आमदार इंद्रनील नाईक म्हणाले, मतदारसंघात जातोय. त्यानंतर वडिलांशी बोलून निर्णय घेणार. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाड कुठे आहेत, माहीत नाही. त्यांनी फोन घेतलेला नाही. जुन्नरचे आमदार अतुल बेनके लोकांची मतं जाणून निर्णय घेणार आहेत. वडगावचे आमदार सुनील टिंगरे हे काही दिवसांनी निर्णय घेणार आहेत. माढाचे आमदार बबन शिंदे चार-पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहेत. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे म्हणाले, मला आता काही विचारू नका. मी नंतर स्पष्ट बोलणार.

देवळालीच्या आमदार सरोज अहिरे अजित पवार यांच्या शपथविधीला होत्या. मात्र त्या नॉट रिचेबल आहेत. अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटलं की, मतदारसंघात जातो. दोन दिवसानंतर बोलणार.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.