पूल दुर्घटनेला जबाबदार कोण, संध्याकाळपर्यंत सांगा : मुख्यमंत्री

मुंबई : पूल दुर्घटनेबाबत आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याच आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेरील पूल दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील जखमी आणि घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही अशा दुर्घटना होतात, हे अतिशय […]

पूल दुर्घटनेला जबाबदार कोण, संध्याकाळपर्यंत सांगा : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : पूल दुर्घटनेबाबत आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याच आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सीएसएमटी रेल्वेस्थानकाबाहेरील पूल दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेतील जखमी आणि घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही अशा दुर्घटना होतात, हे अतिशय धक्कादायक आहेत. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी तर होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतिले आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात कलम 304 (अ), 337, 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मृतांचे नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील एकूण 445 पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. तर काही पुलांची डागडुजी करण्याचा सल्ला दिला होता. सीएसटीएम स्टेशनजवळ जो पूल कोसळलाय, त्याचंही ऑडिट करण्यात आलं होतं. पण या ऑडिटमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय. या पुलाची निर्मिती 1984 मध्ये करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे

ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री

कसाब पुलाने घात केला, चालता चालता पूल कोसळला!

सीएसएमटी स्टेशनजवळ पूल कोसळला, मृतांचा आकडा पाचवर पोहोचला

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.