रात्रीस खल चाले, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची रात्री उशिरा ‘वर्षा’वर बैठक

राज्यभरात आज मुसळधार पाऊस पडला. यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रात्री उशिरा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आधी अजित पवार गेले. यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे दाखल झाले. यावेळी या तीनही नेत्यांमध्ये अतिशय महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

रात्रीस खल चाले, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची रात्री उशिरा 'वर्षा'वर बैठक
शिंदेंच्या 'वर्षा' बंगल्यावर हालचाली वाढल्या
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 12:50 AM

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने गुरुवारी (25 जुलै) अक्षरश: झोडपून काढलं. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पुण्यात तर प्रचंड हाहा:कार झालेला बघायला मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खडकवासला धरणातून विसर्ग झालेलं पाणी वस्तीत शिरलं. त्यामुळे शेकडो वाहनं, घरे पाण्याखाली गेली. पुण्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. पुण्यातील परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आधी आढावा घेतला. यानंतर अजित पवार तातडीने पुण्याच्या दिशेला रवाना झाले. त्यांनी पुण्याच्या कंट्रोल रुमला भेट देत आढावा घेतला. यानंतर अजित पवार थेट पुण्याच्या रस्त्यांवर उतरले. त्यांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी केली आणि त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या. या सगळ्या घडामोडींनंतर आता रात्री उशिरा महत्त्वाच्या हालचाली घडल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांना योग्य आदेश देवून आल्यानंतर आज रात्री पुन्हा मुंबईत परतले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी मुंबईत परतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आधी अजित पवार गेले. यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तीनही नेत्यांमध्ये अवांतर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता?

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्याच्या राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत कशी आणि किती करायची? या विषयावर बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत इतर कोणत्याही विषयांवर चर्चा झालेली नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सर्व नेते राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.